इफकोची गहू पिकासाठी तणनाशके
गहू पिकासाठी शिफारस असणारी तणनाशके
तणनियंञणासाठी इतर पर्याय उपलब्ध नसल्यासच तणनाशकांचा वापर करावा...
शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर केला तरीही पिकाची वाढ काही काळापुरती मंदावत असते...
तणनाशकांचा वापर करताना जमिनीमध्ये ओल असावी...
शेजारील व आंतरपिकाचा विचार करूनच तणनाशकांची फवारणी करावी...
कोणतेही तणनाशके एकञ करून वापरताना तज्ञांचा सल्ला घ्यावा...
मोकळ्या शेतात लागवडी अगोदर वापरावयाचे तणनाशक -
*पॅरोक्वेट (कबुटो)-*गवत ६ इंच उंच होण्याच्या अगोदर वापरावयाचे, बिन-निवडक, उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक. गहु लागवडी पुर्वी वापरावयाचे.
*ग्लायफोसेट (गेन्की)-* बिन-निवडक, उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक. गहु लागवडी पूर्वी वापरावयाचे.
_गहु लागवडीनंतर मात्र तण उगवणीपूर्वी वापरावयाची तणनाशके_
*पेंडीमेथिलिन (कोकोरो )-*गहू पेरणीनंतर ताबडतोब पेंडीमेथिलिन दहा लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मि.लि. या प्रमाणात मिसळून फवारणी करावी... उगवुन आलेले तण नियंत्रणात येत नाही.
गहु लागवडीनंतर मात्र तण उगवणीनंतर वापरावयाची तणनाशके
मेटसल्फ्युरॉन मिथाईल (माकोतो )- गहू उगवणीनंतर १० ते १५ दिवसांत वापारवे. वापर केल्यानंतर गव्हाची पाने काही प्रमाणात पिवली पडू शकतात, मात्र २ आठवड्यात पुर्वव्रत होतात. वापर केल्यानंतर कडाक्याची थंडी पडल्यास मात्र गव्हांस जास्त ईजा पोहचते.
मेटसल्फ्युरॉन मिथाईल ( माकोतो )- लागवडीनंतर २५ ते ३५ दिवसांत वापरावे. तणास २ ते ४ पाने असावित आणि जमिनीत ओल असावी. रेसिड्युअल इफेक्ट असल्यामुळे जास्त काळ नियंत्रण मिळते.
अधिकृत विक्रेते
सातारा,कोरेगांव तालुका शेतकरी संघ व शाखा......
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro