जवस लागवड
जवसलागवडीसाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी. लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. लागवड 45 सें.मी. x 10 सें.मी. किंवा 30 सें.मी. x 15 सें.मी. अंतराने करावी. लागवडीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे लागते. जिरायती पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी पेरून द्यावे. बागायती पिकासाठी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर 45 दिवसांनी 30 किलो नत्र द्यावे. जवस आणि हरभरा (4ः2), जवस आणि करडई (4:2) किंवा जवस आणि मोहरी (5ः1) या प्रमाणात आंतरपिकांची लागवड करता येते. हेक्टरी सात क्विंटल जवसाचे उत्पादन मिळते.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro