Ticker

6/recent/ticker-posts

Weather Update : तापमानात चढ-उतार; चटका कायम

Weather Update : तापमानात चढ-उतार; चटका कायम
राज्यात उन्हाळा हंगामाला सुरुवात झाली आहे. कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका कायम आहे.

पुणे : राज्यात उन्हाळा हंगामाला (Summer Season) सुरुवात झाली आहे. कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने थंडी कमी झाली असून, उकाड्यातही वाढ कायम आहे.

आज (ता. २) राज्याच्या कमाल तापमानातील वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यपासून राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला. कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने झळाही वाढत आहेत. बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश तापमानाची नोंद झाली.

तर अकोला, धुळे, वाशीम येथे तापमान ३७ अंशांवर होते. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशाच्या पुढे गेले आहे.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होतच आहे. बुधवारी (ता. १) राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या पुढे असल्याने थंडी ओसरली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या