कृषी विमा कंपनीकडून टोल फ्री मार्गदर्शन
प्रधानमंत्री पीक विमा योजनाकृषि आणि कृषक कल्याण मंत्रालय
पीक विमा योजना तयार करणा-या भारतीय कृषी विमा कंपनीने आता टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. इतर खासगी कंपन्यांनी देखील अशी सेवा सुरू केल्यामुळे शेतक-यांची गैरसोय दूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रायगड,सिंधुदुर्ग,नंदूरबार,औरंगाबाद,नांदेड, उस्माननाबाद भागातील शेतकरी आता भारतीय कृषी विमा कंपनीशी थेट संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकतात. त्यासाठी 18001030061 हा क्रमांक ठेवण्यात आला आहे.
02261710900 तसेच 61710901 या दूरध्वनी क्रमांकावर देखील विमा कंपनीकडून माहिती दिली जाणार आहे. या कंपनीच्या पत्रव्यवहाराचा पत्ता हा स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, 400023 असा आहे.
राज्यातील शेतक-यांसाठी आता पूर्वीप्रमाणेच एकच सरकारी विमा कंपनी काम करणार नाही. खासगी कंपन्या देखील कृषी विमा उद्योगात उतरल्या आहेत. त्यासाठी या कंपन्यांना विविध देखील जिल्हे वाटून देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro