Ticker

6/recent/ticker-posts

चांदवड तालुक्यातील दहिवद येथे हवामान अनुकुल तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला

चांदवड तालुक्यातील दहिवद येथे हवामान अनुकुल तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी  तालुक्यातील विविध गावांमध्ये अशा प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मा.तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी दिली मा.उपवियोग कृषी अधिकारी भट्टू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी संगीता मिसाळ यांनी शेतकरी शिवाजी रमेश निंबाळकर यांच्या शेतात रुंद सरी वरंबा पद्धतीने बेड तयार करण्याचे तसेच त्यावर बियाणे टोकन करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले या पद्धतीचे स्पष्ट स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की लहरी हवामानाच्या परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी सरीतून सहज निघून जाते तरी पावसात खंड पडल्यास पिकांना तग धरण्यास मदत होते या तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होण्याबरोबरच पिकाचे नुकसान टाळता येते  असेही त्यांनी नमूद केले शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा विचार करून आधुनिक व शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमास दहिवद गावचे सरपंच सौ रत्नाबाई खांदे, दिपाली ताई निंबाळकर, मनीषा निंबाळकर,स्वप्निल निंबाळकर, संदीप वाघमोडे, गणपा वाघमोडे बाळू केदारे,बाळू वाघमोडे, शिवाजी वाघमोडे,शिवाजी निंबाळकर, विशाल जाधव, गणेश गांगुर्डे,तानाजी खांदे, एकनाथ झुरळे,नवनाथ वाघमोडे पोलीस पाटील रमेश निंबाळकर इ. शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या