Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा साळसाने येथे शाळा पूर्वतयारी मेळावा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)आज जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा साळसाने येथे शाळा पूर्वतयारी मेळावा टप्पा क्रमांक एक घेण्यात आला प्रथम संस्था व जिल्हा परिषद शाळा साळसाने व शाळा व्यवस्थापन समिती साळसाने यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 -27 साठी नवीन बालकांचे इयत्ता पहिलीसाठी प्रवेश निश्चिती करण्यात आली जवळपास 18 विद्यार्थ्यांचे प्रवेश आज पूर्ण करण्यात आले उर्वरित नव विद्यार्थ्यांचे प्रवेशही जून महिन्यामध्ये पूर्ण केले जातील शाळेतल्या काही ऍक्टिव्हिटीज प्रथम संस्थेने दिलेल्या पुस्तिका यांचे पालकांना वाटप करण्यात आले त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री महाजन सर श्री पवार सर यांनी मेहनत घेतली कार्यक्रमासाठी सरपंच अनिल ठाकरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप ठाकरे उपाध्यक्ष शांताराम ठाकरे अंगणवाडीच्या सेविका शालिनी ठाकरे प्रमिला ठाकरे तसेच गावातील माता पालक सदस्य पालक सदस्य इत्यादी उपस्थित होते येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ चॉकलेट पावलांचे ठसे इत्यादी उपक्रम त्याबरोबरच अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या