Ticker

6/recent/ticker-posts

विद्राव्य खतांच्या ग्रेड्‌स

विद्राव्य खतांच्या ग्रेड्‌स
विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्‌स पिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात. 
1) 19:19:19 यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र हा अमाईड, अमोनिअम व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो.
2) 12:61:0:यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच फळ-फांद्यांच्या वाढीसाठी या खताचा उपयोग होतो, याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात.
3) 0:52:34 फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळांची योग्य पक्वता व रंगासाठी हे खत वापरले जाते. या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात.
4) 13:0:45: या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी व पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्‍यकता असते. या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते.
5) 0:0:50: या खतामध्ये पालाश बरोबर उपलब्ध स्वरूपातील गंधक असतो. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते. या खतास पोटॅशिअम सल्फेट म्हणतात. विद्राव्य खते ठिबक संचातून व्हेंच्युरी, बायपास दाब टाकी (प्रेशर टॅंक) किंवा थेट संचामधून देता......................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या