Ticker

6/recent/ticker-posts

तुर पिकाची सध्याची परिस्थिती व उपाययोजना

तुर पिकाची सध्याची परिस्थिती व उपाययोजना

       
  गेल्या काही दिवसापासून आपल्या भागात सतत व जास्त पावसामुळे जमिनीत ब-याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्यामुळे तुर पिकाची काही झाडे मलुल होऊन सुकत आहेत

तुर पिकावर बहुतेक शिवारात पाने गुडाळणारी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे तसेच मर रोगाची लागण झाल्याने तुर उधळत आहेत.

उपाय

खत व्यवस्थापन

-तुरीला एकरी 1 bag 10.26.26 खताचा डोस द्यावा तसेच गंधक, झिंक व फेरस सल्फेट अनुक्रमे 3 , 5 व 10 kg सुक्ष्म खते जमिनीतुन द्यावे

ड्रेचिंग

-मर रोग नियत्रंणासाठी ताबडतोब 150 ग्रॅम 13.0.45 + 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम किंवा कापर आक्सीक्लोराइड प्रति पंप्म ड्रेचिंग करावी

तूर पिकावरील फवारणी

पहीली फवारणी -
पिकाला फुले येउ लागताच -

रोगर 45 ml किंवा निंबोळी अर्क 30 ml + कार्बेन्डेझिम  15 gm प्रति 10 + Rcf मायक्रोला 50 gm प्रती 10 lit पाण्यात मिसळून फवारणी करावी

दुसरी फवारणी -
50 टक्के फुले असताना -

ट्रायझोफास 45ml किंवा क्लोरपायरिफाँस 30 ml +मन्कोझेब 30 gm +Rcf मायक्रोला 50gm किंवा  0.52.34 75 gm प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तिसरी फवारणी -
शेंगा भरल्यावर -

मोनोक्रोटोफाँस 25 मिली किंवा  क्विनॉलफॉस 30 ml  किंवा इमामेक्‍टीन बेन्झाइट 8 gm  किंवा कोरोजन  5gm + साफ  30 gm +0.0.50 किंवा पोटाशीयम सोनाइट 100 gm 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Source:
Manoj Lokhande

कृषि विभाग

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro