बऱ्याच शेतकरी बंधुंना आपल्या द्राक्ष बागेत भुरी आटोक्यात आणन्यात अपयश येत आहे. तरी खालील काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
1. बागेला पाण्याचा ताण देऊ नये. (वापसा पाहुन पाणी देणे)
2. घड़ाच्या खालील पाने तसेच पिवळी झालेली पाने काढणे.
3.भूरी असल्यास एकरी 600 लीटर पेक्षा कमी पाण्यात फवारनी करु नये.
4. ट्रायझोल गटासोबत पोटेशियम बायकार्बोनेटचा वापर फायदेशीर ठरेल.
5. दोन ट्रायझोल गटाच्या मधिल स्प्रे सल्फर (1.5 - 2.0 ग्राम / ली ) घ्यावा. जेनेकरुन ट्रायझोल गटाचा रेजिस्टेंट होणार नाही.
6. नवीन गटातील भूरिनाशके लूना एक्सपीरियंस @ 200 मिली / एकर व एक्रिसीओ @ 100 मिली / एकर यांचा वापर फायदेशीर ठरेल.
7. या व्यतिरिक्त ट्राइकोडर्मा + बेसिलस सबटिलिस अथवा ट्राइकोडर्मा + सुडोमिनास अशी अदलुन बदलून स्प्रे घ्यावेत. हे जैविक स्प्रे शक्यतो संध्याकाळी घ्यावेत.
8. पोटाशची कमतरता असेल म्हणजेच पानाच्या वाट्या झाल्या असतील तर भूरीवर लवकर नियंत्रण मिळत नाही. तरी पोटेशचा वापर पान-देठ अथवा माती परीक्षण अहवालानुसार करावा.
धन्यवाद !
*विजय पवार आणि डॉ. ओमप्रकाश हिरे*
*🌾होय आम्ही शेतकरी 🌾*
महाराष्ट्र राज्य
-krushi-vikas.blogspot.com
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro