कांद्याच्या अनेक सुधारित जाती आहेत -
१) बसवंत - ७८०
२) एन- ५३
३) फुले सफेद
४) फुले सुवर्णा
५) एन - २-४ -१
६) एग्री फाउंड डार्क रेड
७) एग्री फाउंड लाईट रेड
८) एग्री फाउंड व्हाईट
९) अर्का निकेतन
१०) पुसा रेड
११) एन २५७ - ९ -१
१२) अर्का कल्याण
-----------------------
01feb 2017:
–--------------------
कांद्याच्या ज्या सुधारित जाती उपलब्ध आहेत त्यापैकी विविध जातींची हंगामानुसार लागवड केली जाते खरीप हंगामासाठी प्रामुख्याने बसवंत ७८० फुले सफेद एन ५३ ह्या जाती तर रब्बी हंगामासाठी फुले सुवर्णा एन २ - ४ -१ , एन २५७ - ९ - १ ह्या जाती प्रसिद्ध आहेत अर्का निकेतन फुले सफेद फुले सुवर्णा ह्या जातींची लागवड उन्हाळी हंगामात होते महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फुरसुंगी नाशिक लाल तसेच फिक्कट तांबूस किंवा हरणा ह्या स्थानिक जातींची लागवड केली जाते काही प्रमुख जातींची माहिती व वैशिठ्ये खालीलप्रमाणे आहेत
१) बसवंत - ७८० - महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण विकसित केला असून महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी ह्याची शिफारस केली आहे ह्या जातीचे कांदे शेंदरी लाल रंगाचे व उभट गोलाकार असतात मध्यम तिखट व मध्यम साठवण क्षमता असलेले हे कांदे आकाराने मध्यम व मोठे असतात ह्यामध्ये डेंगळे व जोडकांद्यांचे प्रमाण खूपच कमी असते लागवडीपासून १०० ते ११० दिवसात हि जात तयार होते ह्या जातीचे सरासरी २५० क्विंटल प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते
२) एन - ५३ - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ह्यांनी हा वाण विकसित केला असून खरीप हंगामासाठी हा वाण महाराष्ट्र व उत्तरप्रदेशात प्रसिद्ध आहे ह्या जातीचे कांदे रंगाने लाल भडक असून किंचित चपटे मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात चव मध्यम तिखट असून साठवणीस योग्य नाहीत लागवडीपासून १०० ते ११५ दिवसात तयार होतात सरासरी २०० ते २५० क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते
३) फुले सफेद - महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १९९५ मध्ये हि जात विकसित केली असून तिची खरीप हंगामासाठी शिफारस केली आहे ह्या जातीची रांगडा हंगामातही लागवड होते हि जात भागल ह्या स्थानिक पांढऱ्या रंगाच्या कांद्यापासून निवड पद्धतीने विकसित केली असून नावाप्रमाणे पांढऱ्या रंगाचे व गोलाकार असतात हे कांदे साठवणीत चांगले टिकतात कांद्यातील एकूण द्रव्य पदार्थ १४.५० टक्के आहे सरासरी उत्पन्न २३० क्विंटलपर्यंत मिळते
४) फुले सुवर्णा - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे १९९७ मध्ये हि जात खरीप रांगडा आणि रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आली येलो टेक्सस आणि एन - २ - ४ - १ ह्यांच्या संकरातून हिची निर्मिती करण्यात आली आहे पिवळ्या रंगाची व किंचित विटकरी छटा असणारी हि जात आहे ह्या कांद्याचा आकार गोल असून तो टणक आणि मध्यम तिखट असतो हि जात लागवडी पासून साधारण ११० दिवसात तयार होते व सरासरी उत्पन्न २३५ क्विंटल प्रती हेक्टर मिळते
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro