गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण :
* कपाशीची अर्धवट उमलेली फुले (गुलाबी बॊडअळी ग्रस्त डोमकाळ्या ) तोडून जाळावीत .
* एकरी 4 ते 5 फेरोमन सापळे पिकात 4 फुट ऊंच काठीला
टांगावेत .दोन सापळ्यातील अंतर 150 फुट ठेवावे .
* प्रति सापळ्यात गुलाबी बोंड अळीचे प्रति दिवस 7 ते 8 नर पतंग सतत 3 दिवस दिसून येताच त्वरीत फवारणी करावी .
* पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे उभारावेत.
* कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन
* अंझाडिरेक्टीन 10000 पीपीएम 15 मि.लि. प्रत्येक फवारणी मध्ये मिसळावे
* आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढील किटकनाशकांची फवारणी करावी.
* पहिली फवारणी * :
प्रादुर्भावअत्यंतकमी असल्यास
प्रोफेनोफॉस ५० इसी 30 मिली
क्यूरॉकरॉन , करीना
किंवा प्रोफेनोफॉस 40 % + सायपर मेथ्रीन 4 % (पॉलीट्रिन सी)
प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
दूसरी फवारणी :
प्रादुर्भाव सुरु होताच .......
थायोडीकार्ब ७५ डब्लूपी (लारविन) 30 ग्राम
किंवा फेनप्रोप्याथ्रीन 10 ईसी (डेनिटॉल, मिथोथ्रीन ) 15 मिली .
.प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
* तिसरी फवारणी :*
डेल्टामेथ्रीन 1% + ट्रायझोफॉस 35 ईसी 24 मिली (स्पार्क , डेल्टा फॉस , करंट 420 , कॉम्बी)
किंवा कलोरयांटनिलिप्रोल 9.3 ईसी (कोराजन ) 08 मिली .प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
* चौथी फवारणी
इंडोकझ्याकार्ब 14.5% + एसीटामिप्रिड 7.7% एससी 15 मिली किंवा
इमामेकटीन बेंझोएट 1.9 ईसी 17 मिली
किंवा क्लोरयांटनिलिप्रोल 9.3 + लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ इसी 08 मिली मी.ली.
प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*वरील फवारणी मध्ये कोणतेही एकच किटकनाशक घ्यावे ही विनंती .
- अत्यंत *महत्वाचे -
- फवारणी काळजी घेऊन करावी -
* प्रत्येक फवारणी चे वेळी
नाक , तोंड मास्क ने किंवा रुमा लाने झाकावे.
* तंबाखू खाऊ नये .
* नशा करू नये ,
* अंग पूर्ण झाकेल असे कपडे घालावे .
*डोळ्यावर पांढरा चष्मा वापरा .
* पायात बूट घालावे .
* साबनाने हात स्वछ धुवावेत.
*अंगांवर जखम असल्यास फवारणी करू नये .
* फवारणीला जातांनी उपाशी पोटी जाऊ नये .
* एक पेक्षा ज्यास्त किटकनाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये .
* ज्यास्त उन्हात फवारणी करू नये .
* अशाप्रकारे कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन करून शेतक-यांसाठी आपले बहुमुल्य पीक वाचवावे.
Source :
रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा प्रस्तुत
तंत्र केसर आंबा लागवडीचे...
तंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मि...
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro