cotton पिक सल्ला
********
»»»»»»»»»»»»»»»»»»»»
कापूस...
कवडी : पानांवर, पानांच्या टोकांजवळ, तसेच पानांच्या कडेला गडद तपकिरी रंगाचे ५-१० मिमी व्यासाचे चट्टे पडतात. बोंडावर लालसर तपकिरी, काळपट, खोलगट चट्टे पडतात. अशी बोंडे उमलत नाहीत. बोंडातील कापूस चिकटून तो कवडीसारखा दिसतो. नियंत्रणासाठी रोगट बोंडे जमा करून त्यांचा नायनाट करावा. रोग दिसताच कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दहिया : रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिसतो. सुरवातीस पानाच्या खालील बाजूने आकारविरहित पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. दही शिंपडल्यासारखी लक्षणे दिसतात. पाने, देठ, पात्या, फुले, बोंडांवर रोगाची लक्षणे दिसतात. रोप किंवा पिकवाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते. पात्या, फुले व बोंडे गळतात. नियंत्रणासाठी शेतातील रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करावा. विद्राव्य गंधक ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जीवाणूजन्य करपा : सुरवातीस पानाच्या खालील बाजूने तेलकट कोनात्मक तांबड्या काळपट रंगाचे ठिपके दिसतात. रोगाची सुरवात साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. पानाच्या मुख्य व उपशिरांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. यामुळे पानाच्या शिरा काळपट किंवा तांबड्या रंगाच्या दिसतात. फांद्यांवर काळपट रंगाचे ठिपके दिसतात. फांद्या काळपट पडतात. बोंडावर तेलकट, काळपट ठिपके पडतात. नियंत्रणासाठी रोग दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro