Ticker

6/recent/ticker-posts

कृषी क्षेत्रातील करिअर संधी

कृषी क्षेत्रातील करिअर संधी

👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे.

 *पात्रता* : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक. 


*पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम*


1) *बी.एस्सी (कृषी)*

2) *बी.एस्सी (उद्यानविद्या)*

3) *बी.एस्सी (वनशास्त्र)*

4) *बी.एफ.एस्सी*

5) *बी.एस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान)*

6) *बी.एस्सी (पशुसंवर्धन)*

7) *बी.टेक (अन्नशास्त्र)*

8) *बी.बी.ए. (कृषी)*

9) *बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)*

10) *बी.एस्सी (गृहविज्ञान)*


*प्रवेश प्रक्रिया* : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी धरण्यात येते. शेती विषय बारावीला घेतला असल्यास त्याचे १० गुण वाढीव मिळतात. ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या तसेच भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ टक्के वाढीव गुण प्रवेशासाठी धरले जातात.


🎓 *करिअर संधी* : महसूल विभाग, वन विभाग, पोलीस खाते, वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी, अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.


🏤 *ही आहेत कृषि विद्यापीठे*


▪ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 413722

http://mpkv.mah.nic.in

▪ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 444104

http://pdkv.mah.nic.in

▪ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 431402

http://mkv2.mah.nic.in

▪ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, 415712

http://www.dbskkv.org


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro