Ticker

6/recent/ticker-posts

लष्करी अळी नियंत्रणासाठी

पाऊस पडल्याबरोबर शेतकरी मका पेरतील व त्यानंतर केवळ 15-20 दिवसा मधे मका लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरु होईल. वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त शेतकरी पर्यंत उपाय योजना बाबत महीती  पोचणे आवश्यक आहे.

 *सध्या खालील बाबी होणे आवश्यक आहे.* 

1) सलग मका पिकावर या किडिस अन्डी घालने आवडते. त्यामूळे मक्या सोबत तुर, मूग, उडिद किन्वा इतर कडधान्य पिकाचि लागवड 4 : 2 (मक्याच्या 4 ओळीनंतर प्रत्येकी तूर किंवा मूग किंवा उडिद या पिकाच्या 2 ओळी ) अशा प्रमाणे आंतरपिक म्हणून करने बन्धनकारक आहे. यामूळे आळी गोंधळून त्या शेतात अन्डी घालत नाही. 

2) मका वा कपाशी या दोन्ही पिकाच्या भोवती चवळी फेकून दिल्यास त्यावर मावा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लेडी बर्ड बिटल व अन्य मित्र किड येऊन लष्करी आळी व बोंड आळी खाऊन मारुन टाकतात.

3) मका बियाण्यास  Azhatobactor, PSB , potash Solubilizing bacteria याचि बियाण्यास बीज प्रक्रिया केल्यास पिकाचि वाढ जोमदार होऊन किडीच्या प्रादुर्भावास कमी बळी पडते.त्यामूळे हे दर्जेदार लिक्विड शेतकरी याना घेणे बाबत जागृती करावी. 

4) जेंव्हा मका 12 - 15 दिवसात पहिल्या पोंग्यात येते तेंव्हा मका रोप लहान असल्याने निंबोळी अर्काने ते रोप धुवून काढावे म्हणजे निंबोळीच्या उग्र वासाने पतंग त्या मक्याच्या रोपावर अन्ड़ीच घालणार नाही व पुढे आळीचा प्रादुर्भाव येणार नाही.

 

 - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro