Ticker

6/recent/ticker-posts

हरभरे गळुन पडणे


हरभरे गळुन पडतात, किंवा रोगग्रस्त होतात. जास्त रोपांस लागण झाल्यास शेतातील ठराविक भाग हा पिवळसर रोपांचा दिसु लागतो. रोग अचुक ओळखण्यासाठी ज्यावेळेस, घाट्यांवर , दाण्यांवर देखिल पांढ-या तांबुस रंगाची बुरशी केसा सारखे वाढलेले दिसते, त्यावेळेस या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट होते.अशाच प्रकारची बुरशी खोडावर देखिल वाढलेली दिसुन बुरशीचे जीवाणु हवेत सोडले जातात. या रोगाची लागण हवामानात जास्त प्रमाणात आद्रता असल्यास जास्त प्रमाणात होते. रोगाच्या वाढीसाठी २० ते २५ डिग्री सेल्सियस तापमान आणि हलका पाउस फायदेशिर ठरतो. ज्यावेळेस पानांवर जास्त प्रमाणात पाणी साचुन राहते, तसेच जास्त आद्राता असते त्.ावेळेस पान लवकर मरते. या रोगाची बुरशी जमिनीत, तसेच पिकाच्या अवषेशांवर सुप्तावस्थेत राहते. हि बुरशी १८ महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत राहु शकते, नियंत्रणासाठी कॉपर युक्त बुरशीनाशके, बेनोमिल, सल्फर, क्लोरोथॅलोनिल, झायरम, एम-४५, इय बुरशीनाशकांचा वापर करता येतो.

फायटोप्थोरा

ज्या जमिनीत जमिन कोरडी झाल्यानंतर तडे पडतात अशा ठीकानी, रोगाची लागण रोपाच्या कोणत्याही अवस्थेत जसे बाल्यावस्था, वाढीचा काळ, फुलोरा अवस्था, फळ धारणा या सर्वच अवस्थात होते. रोप मलुल होवुन मरते, पाने पिवळी पडतात🌴🌴🌴🌴🌴

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या