पाटोदा महेश शेटे.:- कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जागतिक पातळीवरील व्यापारपेठ व आयात-निर्यातही जवळपास बंदच झाल्यात जमा आहे. त्यामुळे कृषिमालाची विक्री व्यवस्थापन प्रणाली पूर्णतः मोडकळीस आली आहे. शेतीची मशागत, बियाणे, लागवड खर्च व लागवडोत्तर निंदणी-खुरपणी, तसेच कृषी रसायनाची फवारणी असेल वा अन्य बाबींवर झालेला आकस्मिक खर्च असेल हा खर्च या पूर्वीच शेतकऱ्यांनी स्वतः कडे असलेल्या जमा भांडवलातून केलेला आहे. परंतु आता जितके भांडवल शेती पिकांना लावलं त्याच्या पाच दहा टक्केही उत्पन्न होतं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी असणारी स्वीट कॉर्न अर्थात गोड मकाची बिट्टी उत्पादित करण्याचं काम या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी करतात. या हंगामात घेतल्या जाणाऱ्या मका पिकाला नियमित पाणी भरावं लागतं. तसेच इतरही आकस्मिक खर्च अधिक प्रमाणात येतात, त्यामुळे शेतकरी नियमित मकाची पेरणी न करता गोड मकाची पेरणी करतात. जेणेकरून त्याच्या मधून अधिक उत्पन्न मिळवता येईल. या मकाच्या कंसाला प्रती नग पुणे मुंबईसारख्या ठिकाणी दहा ते वीस रुपये भाव भेटतो परंतु यावर्षी काढणीला आलेली मका विक्रीसाठी कोठे नेणे शक्य नाही, कारण कोरोणा विषाणूमुळे सर्वच शहरांमध्ये वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. शासनाने जरी कृषिमाल वाहतुकीला परवानगी दिली असली तरी रस्त्यावरती लोकच नसतील तर मका खाईल कोण हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कोणी व्यापारीही ही या बिबट्यांना घेण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला या बिबट्या कुठे विकाव्या हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकदा बीटी जास्त दिवसाची झाली की तिच्यातील दाणे कठीण होतात. त्यामुळे ती विकता येत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी मुरघासासाठी ही मका विकताना दिसत आहे. लाखो रुपये उत्पन्न भेटेल अशी अपेक्षा ठेवून घेतलेले हे पीक आज कवडीमोल दहा-पंधरा हजार रुपयांमध्ये विकावं लागत आहे. यातून त्यांचा बियानाचा आणि मशागतीचा खर्च निघनेही मुश्कील आहे. कृषी अर्थव्यवस्थेत शेतीमालाच्या किमती नियमित कमी-जास्त होत असतात, त्यामुळे नेहमीच्या कृषी उत्पन्नाला जोड म्हणून बरेच शेतकरी भाजीपाला करतात. परंतु सध्या शासनाने भाजीपाला विक्रीला जरी परवानगी दिली असली तरीही बाजार मध्ये भाजीपाला घेण्यासाठी गिराईक येऊ शकत नाही. त्यामुळे शेतात पिकलेला केवळ पाच ते सात टक्के भाजीपाला विकला जातो आणि बाकी भाजीपाला फेकून द्यावा लागतो. त्यामुळे बरेच भाजीपाला उत्पादक शेतकरी तोट्यात आलेले आहेत. कोणी वालाची शेती तोडून टाकत आहे, तर कोणी कोबी जनावरांना घालत आहेत, कोणी मिरच्यांमध्ये नांगर फिरवत आहे तर कोणी मेथीची भाजी बी करायला जमलं तर प्रयत्न करून पाहत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी भेटेना, जो द्राक्ष 30 ते 40 रुपये किलो विक्री ह्वायला हवा होता, तो द्राक्ष सहा ते सात रुपये किलो, कोणी घ्यायला तयार होईना. आणि त्यात एप्रिल छाटणी कालावधी जवळ जवळ संपलेला असल्यामुळे तो द्राक्ष किती दिवस झाडावर ठेवायचा हा मोठा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. द्राक्ष जास्त दिवस झाडावरती राहिला तर तो आपोआपच सुकायला सुरुवात होते आणि झाडालाही त्रास होतो. त्यामुळे बरेच शेतकरी असे द्राक्ष तोडून माळरानावर सुकण्यासाठी टाकून देत आहे. जेणेकरून यातून नैसर्गिक पद्धतीने का होईना थोडेफार बेदाणे तयार होऊन किमान मजुरीचा खर्च तरी भागवता येईल. या आधी झालेला औषधांचा आणि खतांचा खर्च भागवणे तर शक्य नाही, परंतु किमान वर्षभर केलेल्या मजुरीचे दोन पैसे तरी हातात आले तरी ते चांगले होईल या आशेवर शेतकरी एक ना अनेक प्रयत्न करुन पाहत आहे. शासनाने गेल्या पाच वर्षात दोन वेगवेगळ्या पद्धतीने कर्जमाफी जाहीर केल्या असल्या तरी, आता कितीही कर्जमाफी केल्या तरी शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल असे वाटत नाही. कारण कर्ज काढून व स्वतःकडे असलेल्या भांडवल लावून जे काही केलं होतं ते पिक, एक तर फेकून द्यावे लागत आहे किंवा कवडीमोल भावात विकावं लागत आहे. द्राक्षाचे पीक घ्यायचं ठरलं तर वर्षभर ते द्राक्षबाग सांभाळावे लागता. त्याच्यावरती खर्च करावा लागतो. मक्याचे पीक घ्यायचं ठरलं तर चार ते पाच महिने शेती त्यात अडते आणि त्याच्यावर खर्च करावा लागतो. वालाची शेती करायची ठरली तर वर्षभर ते सांभाळावं लागतं आणि आजच्या स्थितीला हे वर्षभराचे पीक क्षणात, दोन-तीन दिवसात उद्ध्वस्त करावी लागत आहेत. त्यामुळे शेतीचे अर्थकारण पुरते कोलमडले आहे. एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीच्या दिशेने प्रवास करेल अशी स्वप्न शासन शेतकऱ्यांना दाखवत असतानाच, कोरोणाच्या सावटामुळे शेतकऱ्याचा मोठा स्वप्नभंग झाला आहे. आणि यातून शेतकऱ्याला उजरवणे आता कदाचित सरकारलाही शक्य होईल असं सद्यस्थिती तरी वाटत नाही. कारण शासकीय यंत्रणांचा बहुतेक शासकीय निधीतील गंगाजळी कोरोणा प्रतिबंधासाठी वळवावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा तर बऱ्याच आहेत, की शासनाने किमान बियाणांचा आणि औषधांचा खर्च द्यावा. परंतु शासनाची तिजोरी कोरोणा प्रतिबंधासाठी रिकामी होत आली आहे तर शासन मदत करेल ती कोणा-कोणाला.
तंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मि...
शेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्र...
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट ...
भेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा न...
लवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.
टोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे। DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे। 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे। 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते। 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये। 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे।

वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व...
शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.
NPK:- नत्र-स्फुरद-पालाश 19:19:19 :- पिकाच्या जोमदार वाढीसाठी 12:61:00 :- फुटवा जास्त येण्यासाठी 18:46:00 :- पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 12:32:16 :- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी 10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी 00:52:34 :- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी 00:00:50 :- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro