Ticker

6/recent/ticker-posts

सावली समाजसेवी संस्थेकडून पीपीई किट वाटप
पाटोदा. दि. २५ वार्ताहर :- करोनाचे वाढते संकट लक्षात घेता व आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांना होणारा उशीर लक्षात घेऊन सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा तर्फे आज आरोग्य कर्मचाऱ्यांना पिपीई कीट तसेच मदतनीस व आशा सेविकांना हॅन्ड ग्लोज वाटप करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाटोदा येथे प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी गरोदर महिला, स्तनदा माता व बालकांना केले जाणारे लसीकरण आजपासून नियमित सुरु करण्यात आले. येथील बहुतांशी आरोग्य कर्मचारी करोना संसर्गाच्या भोवऱ्यात सापडले होते. परंतु सध्या पाटोदा 100% करोना मुक्त झाले आहे. तरीही सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद पाळलेला असतांना स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही. हे लक्षात घेऊन सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था पाटोदा मार्फत सदर कर्तव्यावर असणाऱ्या आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना संरक्षित पिपीई कीट वाटप करण्यात आले. तसेच मदतनीस व आशा सेविकांना हॅन्ड ग्लोज वाटप केले गेले. व पुरेशा सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता जन्मताच बी.सी.जी, सहा, दहा आणि चौदा आठवडे कालावधी दिला जाणारा पेंटा, रोटा, इंजेक्शन पोलिओ, ओरल पोलिओ, नऊ महिने पूर्ण झाल्यावर दिला जाणारा गोवर-रुबेला, विटामिन ए, दीड वर्ष पूर्ण झाल्यावर दिला जाणारा डी.पी.टी. बूस्टर, पोलिओ बूस्टर, गोवर रूबेला दुसरा डोस, विटामिन.ए. आदींचे लसीकरण. नियमित सुरू ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. तरी ज्या स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांना लसीकरण करावयाचे आहे त्यांनी कोणतीही शंका-कुशंका न बाळगता लसीकरणासाठी उपस्थित रहावे असे आव्हान सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा व प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा तर्फे कालच विविध प्रकारच्या सोशल मीडिया माध्यमातून करण्यात आले होते. तसेच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, आशा गटप्रवर्तक यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली होती. या आव्हानाला प्रतिसाद देत नेहमीप्रमाणेच सर्व लाभधारक लसीकरणासाठी दिवसभर येत जात होते. यावेळी सोशल डिस्टंस च्या  नियमानुसार लसीकरण करण्यात आले. प्रसंगी येवला तालुका आरोग्य अधिकारी हितेंद्र गायकवाड, सावलीचे सचिव महेश शेटे, प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा वैद्यकीय अधिकारी सायली जंगम, आरोग्य सेविका अर्चना रामपुरे, पोलीस पाटील मुज्जमिल चौधरी, आरोग्य सेवक देविदास शेवाळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या