Ticker

6/recent/ticker-posts

चांदवडच्या पर्वत रंगानी पांघरला हिरवा शालु

काजीसांगवी (दशरथ ठोंबरे-वार्ताहर ):-गेल्या महिन्यात सतत संततधार पडणाऱ्या पावसाने चांदवडच्या निसर्गात भर पडली असुन चांदवडच्या लगत असणाऱ्या सातपुडा पर्वत रांगा हिरवाईने नटल्या आहे. जणु या पर्वतरंगानी हिरवा शालुच परिदान केल्याचा भास निसर्गप्रेमींना होताना दिसत आहे.
चांदवडची ओळख आजही निसर्गरम्य ठिकाण म्हणुन होते, गावाच्या उत्तरला असलेल्या सातपुडा पर्वत रांगाची चांदवडच्या निसर्गात मोठी भर पडली आहे. यामुळे येथिल नगरीत व डोगंरपरिसरात अनेक हिंदी मराठी चित्रपटाचे चित्रीकरणही झाले आहे. त्यात अनेक गड व किल्याचा समावेश असुन चंद्रेश्वरी गड हा निसर्गरम्य ठिकाण म्हणुन प्रसिध्द आहे.
 गडावर पुरातन चंद्रेश्वर तलाव व गणेश कुंड असुन सततधार चालणारया पावसाने पुर्ण भरले आहे. गडावरुन पडणारा मोठा धबधबा निसर्ग प्रेमीसाठी आकर्षक ठरत आहे, तसेच परिसरात पर्वतरांगाच्या डोगरावरील झाडे झुडपे पावसाने हिरवी होऊन खुली आहे डोंगरावरुन पडणारे छोठे-मोठे धबधबे व त्यातून वारयाच्या झुळकीने उडणारया पाण्याचे मनमोहक दृश्य निसर्ग प्रेमिंना जणु भुरळ घालताना दिसत आहे. तसेच या गडावर चंद्रेश्वर महादेवाचे भव्य असे मंदीर व चंद्रेश्वर महाराजाची समाधी स्थान असल्याने श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.तसेच गडावर चारचाकी वाहाने जाण्यासाठी मोठा रस्ता असल्याने मुंबई ,नाशिक सारख्या मोठ्या शहराचा ठिकाणचे निसर्गप्रेमी ,प्रेमयुगल ,काँलेजमधील विद्यार्थी  आनंद घेताना दिसत आहेत. गडाच्या पायथ्याशी कुलस्वामिनी रेणुका मातेचे व उत्तरेला ईच्छापुर्ती गणेशाचे मंदीर  हे या परिसर पर्वतरांगाच्या डोगरानी वेढला असुन पावसाळ्यात पुर्ण हिरवाईन नटला आहे पुढे इंद्रायणी ,वडबारे, राजदेरी, टागसाळ ,साडेतीन रोडगे हे किल्लेही निसर्ग प्रेमीसाठी हिरवाईच्या हिरव्या शालु नटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro