करडई पिकाच्या पाना-फुलावरील काटे पीक तयार होते, तेव्हा ते वाळतात आणि टणक होतात. काढणी करताना हे काटे हाताला आणि पायाला टोचतात त्यामुळे करडई काढणीसाठी मजूर मिळत नाहीत.
अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा (Combine Harvester) वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे. सध्या करडई पीक काढणीच्या अवस्थेत आहे. जातीनुसार करडई पीक १२० ते १४० दिवसात काढणीस तयार होते.
पाने व बोंडे पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. करडई पिकाच्या (Safflower Crop) पाना-फुलावरील काटे पीक तयार होते, तेव्हा ते वाळतात आणि टणक होतात. काढणी करताना हे काटे हाताला आणि पायाला टोचतात त्यामुळे करडई काढणीसाठी मजूर मिळत नाहीत.
म्हणून करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्र म्हणजेच कंबाइन हार्वेस्टर अतिशय उपयुक्त आहे. या यंत्रामुळे काढणी व मळणीचे काम सोपे होते. अगदी कमी वेळात काढणी होते. काढणी खर्चात देखील बचत होते.
करडईच्या झाडाचे बारीक तुकडे होऊन शेतात विखुरले जात असल्यामुळे जमिनीत मिसळून कुजल्यामुळे त्यापासून जमिनीस चांगले सेंद्रिय खत मिळते. या यंत्राद्वारे काढणी केली असता स्वच्छ धान्य मिळते. बहुतेक वेळा शेतकरी शेतातून थेट बाजारात करडई विक्रीसाठी घेऊन जातात.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro