Ticker

6/recent/ticker-posts

PDKV Solar Light Insect Trap : एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप

PDKV Solar Light Insect Trap : एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप
Insect Control : बाजारात विविध प्रकारचे कीटक सापळे उपलब्ध असले तरी एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप विकसित केला आहे. हा सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो.
PDKV Akola News : किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी (Pest Control ) अलीकडे बरेच शेतकरी सौरउर्जेवर चालणाऱ्या कीटक सापळ्यांचा वापर करु लागले आहेत. या सापळ्यांमुळे अगदी कमी खर्चाच प्रभावी कीड नियंत्रण होते. बाजारात विविध प्रकारचे कीटक सापळे उपलब्ध असले तरी एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप विकसित केला आहे. हा सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो.  

बॅटरी फोटोव्होलटाइन पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते. त्यामुळे विजेची बचत होते. यामधून निघणारा विशिष्ट प्रकाश किडींना आकर्षित करून घेतो. यामध्ये सोलर फोटोव्होलटाइन पॅनेल, चार्ज कंट्रोलर आणि पॅनलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड अॅसिड बॅटरी वापरण्यात आली आहे. हा सापळा पूर्णतः स्वयंचलित आहे.

एक ट्रॅप दोन एकर क्षेत्रफळापर्यंत कार्य करू शकतो. सापळ्याची उंची ही पिकाच्या उंचीनुसार १० फुटांपर्यंत ठेवता येते. हा सापळा बागेत फळबागेत, शेडनेट, पॉलिहाउसमध्ये वापरता येऊ शकतो.

सापळा शेतात कसा बसवावा?

- सापळा शेतातील पिकाच्या मध्यभागी ठेवावा.

- स्टँडच्या मधोमध एक मोठा लोखंडी खिळा ठोकावा, त्या मधोमध स्टँड ठेवावा.

- सापळ्याची उंची पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट वर असावी.

- शेतात ठेवण्याअगोदर इलेक्ट्रॉनिक सर्किटवरील बटण सुरू करून ठेवावे.
कीटक भांड्यात पाच ते सहा लिटर पाणी भरावे. त्यात १० ते १५ मिलि रॉकेल मिसळावे.

- सौर पॅनेल नेहमी स्वच्छ ठेवावे.

- पात्रात कीटक जमा झाल्यावर ते दुसऱ्या दिवशी काढून स्वच्छ करावेत. पुन्हा पाणी भरावे.

- धुके व ढगाळ वातावरण असल्यास दिवसा इलेक्ट्रिक पोर्ट लावून ५ ते ६ तास ट्रॅपची बॅटरी चार्जिंग करावी.

- सापळ्याचे शेतात काम झाल्यावर इलेक्ट्रिक सर्किट वरील बटण बंद करून ठेवावे. जेणेकरून सापळा स्वयंनियंत्रित पद्धतीने सुरू होणार नाही.

- सापळ्याचे शेतात काम नसल्यास बॅटरी अधून मधून चार्ज करावी. जेणेकरून सापळा वर्षानुवर्षे सुरळीत सुरू राहील.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या