Ticker

6/recent/ticker-posts

स्वीट कॉर्नचे नियोजन

स्वीट कॉर्नचे नियोजन

✅लावण -
15 मे नंतर-
एक ते दीड एकर----- त्यानंतर १५ दिवसांनी
- पुन्हा तेवढ्याच क्षेत्रात दुसरी लागवड
- सुमारे अडीच महिन्यांत मका काढणीस येतो.
- मिळणारे उत्पादन - एकरी ५ ते ८ टन

⚡खर्चाचा तपशील - (एकरी) ⚡

सर्वाधिक म्हणजे ७००० रुपयांपर्यंत खर्च बियाण्यावर येतो. फवारण्या दोनपर्यंत होतात.
लावणीवेळीच मजूर लागतात. काढणीला दोन लोक पुरेसे होतात. बाकी आंतरमशागत, खते, कणसाला पॉलिथिन असा सगळा मिळून १७ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.

☘मार्केट व दर ☘

मिळणारा दर - किलोला १२ ते १५ रु.
यंदा उन्हाळ्यात अनेक ठिकाणी लागवडी नसल्याने आवक कमी राहिल्याने दर १८ ते २४ रुपये
- पाच टन उत्पादन व दर १२ रुपये धरला, तरी ६० हजार रुपये मिळतात.

चाऱ्याचे बोनस उत्पन्न
मक्यापासून दुहेरी उत्पन्न मिळते. कणसे काढल्यानंतर शिल्लक धाटे जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून उपयोगी येतात. एकरी वीस हजार धाटांपैकी तीन हजार पेंडीपर्यंत चारा मिळतो. पेंडीला ८ रुपये दर
तरी २४ हजार रुपये होतात.

एकूण उत्पन्न - मका अधिक चाऱ्याचे - सुमारे ८४ हजार रु., खर्च वजा जाता ६७ हजार रु. उत्पन्न.
सुमारे तीन महिन्यांत -

👀निष्कर्ष -
कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते.
- अन्य पारंपरिक पिकांपेक्षा किंवा दीर्घ कालावधीच्या पिकांपेक्षा मिळणारे उत्पन्न चांगले असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या