पपई वरिल अथ्रॅक्नोझ
कोलेक्टोट्रिकम ग्लोईओस्पोरीडीस नावाच्या
बुरशीमुळे हा रोग होतो. पक्वतेकडे झुकलेल्या फळांवर
गर्द रंगांचे ठिपके पडतात. हा रोग शक्यतो हिरव्या
रंगाच्या फळांवर दिसुन येत नाही, केवळ अर्ध पक्व
झालेल्या फळांवर दिसुन येतो. फळ पक्व होत
असतांना फळांवरिल डाग देखिल मोठे होतात.
काढणी साठी सदरील फळे अयोग्य असतात.
रोगाची बुरशी तळा कडील पानांच्या देठांवर
देखिल संक्रमित होते, ज्यामुळे पाने गळुन जातात,
तसेच रोगाच्या पुढील प्रादुर्भावास चालना
मिळते.
रोगाच्या नियंत्रणासाठी डायथोन एम ४५, कॉपर
औक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, यापैकी
एकाची १० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस फवारणी
घ्यावी.
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro