Ticker

6/recent/ticker-posts

कलिंगडाची लागवड नियोजन असे कराल jan17

कलिंगडाची लागवड नियोजन असे कराल
♥कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.
♥अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.

♥कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीमध्ये लागवड केली जात असे. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणार्‍या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असे. एप्रिल, मे च्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे. या परिस्थितीमुळे या भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस गेले चाळीस - पन्नास वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.
♥मागील वीस वर्षापासून - लागवडीपासून व्यवस्थित काळजी घेतल्यास मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे फक्त नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत व शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.
♥ कलिंगडाचे महत्त्व :
उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे.
♥कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण : पाणी -९३%, शर्करा पदार्थ - ३.३%, प्रथिने - ०.२%, तंतुमय पदार्थ - ०.२%, खनिजे - ०.३%, चुना - ०.०१%, स्फुरद - ०.०९%, लोह - ०.००८%, जीवनसत्त्व 'क' - ०.००१ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ब' -१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व 'ई' - १ मि. ग्रॅ. असते.
♥ कलिंगड जमीनीचा प्रकार
हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, केल्शियाम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्य विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. तथापि सप्तामृत फवारल्याने हे फळावरील डाग आले नसल्याचा त्या भागातील शेतकर्‍यांचा अनुभव आहे. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या 'रंगाची ('डी ' किंवा 'जी' साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.
♥ कलिंगड हवामान
उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होते नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.
♥ कलिंगडाच्या विवीध जाती
शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.
१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.
४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.
♥संकरित कलिंगड :
१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.
२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य
नोन्यु कंपनीचे किरण कलिंगड लांबट लहान ते मध्यम आकाराचे असल्याने घेणार्‍यालाही परवडत असल्याने याला वजनावर ८ ते १५ रू. किलो भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरले आहे. याचा गर लालभडक, मधूर गोड चवीचा असल्याने याला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. नामधारी कंपनीच्या २९५, २९६, ४५० या जातींची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. शेतकरी नवीन व चांगल्या वाणांनी नेहमी मागणी करतात.
♥ कलिंगड लागवडीचा हंगाम :
लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो. लागवडीचा हंगाम कोणताही असला तरीही त्यास योग्य औषधे वापरल्यास प्रतिकूल हवामानात देखील वाढ चांगली झाल्याने अधिक उत्पादन मिळते. त्याचबरोबर दर्जाही सुधारतो त्यामुळे भावदेखील चांगला मिळतो. पंढरपूर, बारामती, जुन्नर भागामध्ये कलिंगडाची लागवड बाराही महिने करतात व ही कलिंगडे आडहंगामामध्ये निर्यातदेखील करतात.
♥ कलिंगड लागवड :
लागवड सरी पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. शक्यतो सरी पद्धतीनेच लागवड करावी. दोन मीटर अंतरावर सर्‍या काढून सरीच्या दोन्ही बाजूस दोन फुटावर लहान लहान आळी तयार करावी. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे. पाणी कमी असल्यास १० -१० फुट अंतरावर सरी काढून ४ -४ फुटावर लागवड करावी.
♥ कलिंगड थंडीमध्ये बियांची उगवण कमी होते.
वाढ लवकर होत नाही.
यासाठी कोमट पाण्यामध्ये 'जर्मिनेटर' ची प्रक्रिया करावी. यासाठी २५० ग्रॅम बियासाठी २५० मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवूननंतर २५ मिली जर्मिनेटर टाकावे. बियाणे जास्त असल्यास १ किलोपर्यंत १ लि. पाणी वरीलप्रमाणे घेऊन जर्मिनेटर २५ ते ३० मिली वापरावे अशा द्रावणात ३ ते ४ तास बी भिजवून सुकवून लावल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस लवकर व निरोगी होते. मर होत नाही.
♥ कलिंगड बियाणे :
साधारणत: शेतकरी एक किलो बी प्रती एकरी वापरतात. परंतु वरील प्रमाणे प्रक्रिया करून एका ठिकाणी एकच बी लावल्यास अर्धा किलोपेक्षा कमी बी एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे होते. संकरित जातींचे एकरी ३०० ते ३५० ग्रॅम देखील बी पुरेसे होते. सरी पाडून बी टोकल्यास वेल पसरावयास जागा राहते. बी टोकताना प्रत्येक हुंडीवर पसभर सेंदीय खत टाकून बी टोकावे. बी जर्मिनेटरमध्ये बुडवून लावल्यास आंबवणी, चिंबवणीस उशीर झाला तरी चालते.
♥ कलिंगड बियांची ६ ते ८ दिवसांनी उगवण होते.
या संदर्भात बहूळ, ता. राजगुरुनगर येथील प्रगतीशील शेतकर्‍याने असा अनुभव सांगितला आहे की, एरवी कलिंगडाचे बी १० व्या दिवशी उगवते, थंडीत ३ आठवड्यांनी उगवते.
♥४० दिवसांनी फूल लागण्यास सुरुवात होऊन ६० दिवसांनी गुंड्या लागणे सुरू होते. शक्यतो एका वेलीवर दोनच फळे ठेवावीत.
♥ कलिंगड पाणी व्यवस्थापन
पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.
♥ कलिंगड खते व्यवस्थापन
सुरुवातीला बी टोकतान आणि नंतर खुरपणीच्या वेळेस पीक १ ते १।। महिन्याचे झाल्यावर बांगडी पद्धतीने द्यावे. रासायनिक खतांचा वापर करावयाचा असल्यास एक महिन्याच्या अंतराने मिश्रखत आळे पद्धतीने प्रत्येकी ३० ग्रॅम द्यावे. फूल लागल्यानंतर ५० ग्रॅम व गाठी/ गुंडी लागल्यानंतर ६० ग्रॅम मिश्रखत द्यावे. फळांच्या गाठी मोठ्या झाल्यानंतर खत देवू नये.  सेंद्रिय खत वापरल्याने जमीन भुसभुशीत होऊन गारवा वाटतो त्यामुळे वेलीची उन्नग्रहण करण्याची क्रिया सुरळीत होते. त्यामुळे वेलींची वाढ जोमाने होऊन फळांचे पोषण चांगले होते. उन्हाळी कलिंगड पिकला शेणखत, कंपोस्ट खत  अतिशय फायदेशीर ठरते
♥ कलिंगड पीक संरक्षण : (कीड व रोग)
कीड : नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो.
१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
या किडीच्या नियंत्रणासाठी नुवान १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.
२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.
या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारिल १५ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारावे.
३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात सुरुवात होते.
या किडीच्या नियंत्रणासाठी  मेलॅथिऑन (५०%) १० मिली १० लि. पाण्यातून फुले येण्याच्या काळात एकदा व नंतर फलधारणा होताना एकदा फवारावे.
♥ कलिंगड रोग व्यवस्थापन
१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.
२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.
३) मर : बुरशीजन्य रोग असून वेळी संपूर्ण जळून जातात. यासाठी जर्मिनेटर या औषधाचा वापर बीजप्रक्रियेसाठी केल्यास मर होते नाही.
♥ कलिंगड विशेष काळजी :
फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. यासाठी फळे दोन सर्‍यांच्या उंचवट्यावर ठेवावी किंवा फळाखाली चगाळ (भात, बाजरी, गव्हाचा काड ) ठेवावा.
तोडणी व उत्पादन : साधारणपणे ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.
♥ कलिंगड फळे काढणीस तयार झाली, हे कसे
ओळखावे ?
१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.
२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.
३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.
♥ कलिंगड उत्पादन
साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.
♥कलिंगडाची लागवड 17 अंश ते 18 अंश से. तापमानात थंडकमी झाल्यावर करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान 40 ते 45 दिवस तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे.
पिकाचा कालावधी जातीपरत्वे 90 ते 110 दिवसांचा असतो.
♥पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद जिवाणू खताची 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
♥लागवडीसाठी चार मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात. सरीच्या दोन्ही बाजूंस 90 सें.मी. अंतरावर खड्डे करून त्यात दोन किलो चांगले कुजलेले शेणखत आणि दहा ग्रॅम कार्बारिल पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन बिया एकमेकांपासून तीन ते चार सें.मी. अंतरावर दोन ते अडीच सें.मी. खोलीवर पेराव्यात. एक हेक्‍टर लागवडीसाठी साधारण अडीच किलो बियाणे लागते.
♥माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 टन शेणखत, 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. खते देताना संपूर्ण शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची 1/3 मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे.
♥अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फळे तडकतात. तेव्हा पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे.
♥फळे काढणीस तयार झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा बदबद असा आवाज येतो व अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो. फळाच्या देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. काढणी सकाळी करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली रुचकर लागतात.
♥कलिंगड पिकावर भुरी, करपा व मर रोगांचा आणि तांबडे व काळे भुंगेरे, फळमाशी, मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. किडींच्या नियंत्रणासाठी बिगर हंगामात शेतीची चांगली नांगरट व कुळवणी करावी. म्हणजे तांबडे भुंगेरे, फळमाशी इ. किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होऊन त्याच्या बंदोबस्तासाठी मदत होईल.
संकलित!
[1/5, 7:27 AM] ‪+91 96233 63351‬: काकडी
    काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते.
हवामान व जमीन : काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी मध्‍यम ते भारी जमीन या पिकास योग्‍य असते.
लागवडीचा हंगाम : काकडीची लागवड खरीप आणि उन्‍हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठीकाकडीची लागवड जून जूलै महिन्‍यात व उन्‍हाळी हंगामामध्‍ये जानेवारी महिन्‍यात करतात.
वाण : शीतल वाण - ही जात डोंगर उताराच्‍या हलक्‍या आणि जास्‍त पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात.  फळे रंगांनी हिरवी व मध्‍यम रंगाची असतात कोवळया फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते   हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.
पुना खिरा - या जातीमध्‍ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्‍हाळी हंगामात चांगली असून हेक्‍टरी उत्‍पादन 13 ते 15 टन मिळते.
प्रिया - ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.
पुसा संयोग - लवकर येणारी जात असून फळे हिरव्‍या रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 25 ते 30 टन मिळते. या शिवाय पॉंइंट सेट, हिमांगी, फुले शुभांगी यासारख्‍या जाती लागवडीस योग्‍य आहेत.
बियाणे प्रमाण :  या पिकाकरीता हेक्‍टरी 2.5 ते 4 किलो बियाणे लागते.
पुर्वमशागत व लागवड : शेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 30 ते 50 गाडया शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी. उन्‍हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर स-या पाडून घ्‍याव्‍यात. खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करावयाची असल्‍यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रूंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदूर चरांच्‍या दोन्‍ही बाजूंना 90 सेमी अंतरावर ओळी 30 × 30 × 30 सेमी अंतरावर आकाराचे खडडे तयार करावेतञ प्रत्‍येक खडडयात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे. प्रत्‍येक आळयात 3 ते 4 बिया योग्‍य अंतरावर लावाव्‍यात.
खते व पाणी व्‍यवस्‍थापन : काकडी पिकास 50 किलो नत्र 50 किलो पालाश 50 किलो स्‍फूरद लागवडीपूर्वी द्यावे. व लागवडीनंतर 1 महिन्‍याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्‍ता द्यावा व पावसाळयात 8 ते 10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे व उन्‍हाळयात 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत : काकडीचे वेलांना आधार दिल्‍यास फळांची प्रतीक्षा सुधारते परंतू ते खर्चिक असल्‍याकारणाने महाराष्‍ट्रामध्‍ये  काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे. फळे लागल्‍यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्‍हणून फळांखाली वाळलेला काटक्‍या घालाव्‍यात.
काढणी व उत्‍पादन : फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्‍हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्‍या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्‍टरी 200 ते 300 क्विंटल पर्यंत उत्‍पादन मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खूप छान माहिती दिलीत
    सगळेच मुद्दे मांडले आहेत त्यामुळे कोणतीच शंका राहिली नाही
    🙏🏻🇮🇳🙏🏻

    उत्तर द्याहटवा

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro