Ticker

6/recent/ticker-posts

पुणे मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ आढळली भुयार

पुणे : पुणे शहरात ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ एक भुयार आढळलं आहे. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचं काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असताना 12 ते 15 फुटांवर भुयारी मार्ग सापडला आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर इथल्या अॅग्रीकल्चर कॉलेजसाठी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरु होतं. पायलिंग मशीनच्या साहाय्याने जमिनीमध्ये खड्डा खोदण्याचं काम सुरु होतं. तेवढ्यात बस स्टॉपजवळची जमीन खचली आणि तिथे सुमारे 8 ते 10 फुटांचा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरुन पाहणी केली असता, तिथे पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचं आढळंले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या