सूर्यफुलाचे उत्पादन वाढवण्यासाठी हे करा
भारी व खोल काळ्या जमिनीत तूर + सूर्यफूल (3-3), सोयाबीन + सूर्यफूल (2-1) व भुईमूग + सूर्यफूल (6-2) या आंतरपीक पद्धती सरस आढळून आल्या आहेत. लागवडीसाठी शिफारशीत वाणांची सुधारित तंत्राने लागवड करावी.
1) सूर्यफुलासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व 6.5 ते आठपर्यंत सामू असणारी जमीन योग्य असते. चोपण जमिनीत सूर्यफुलाच्या उगवणीस अडचण येते.2) सूर्यफुलाच्या मुळ्या 60 सें.मी.पेक्षा खोल जाऊन अन्नद्रव्ये शोषण करत असल्याने पेरणीपूर्वी एक नांगरणी करून, दोन वखराच्या पाळ्या देऊन रान भुसभुशीत तयार करावे. जमिनीचा मगदूर व त्यातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले राखून ओलावा टिकवून ठेवणे, शेवटच्या वखराच्या पाळीआधी पाच ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.3) पेरणीपूर्वी तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास लावावे. पिकास नत्र व स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी ऍझोटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.4) संकरित सूर्यफुलाचे वाण हे सुधारित वाणापेक्षा अधिक प्रमाणात रासायनिक खतास प्रतिसाद देत असल्याने त्यास हेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे.5) कोरडवाहू क्षेत्रात जेथे नत्र व स्फुरदाचे प्रमाण कमी आहे, अशा खोल काळ्या जमिनीत संकरित सूर्यफुलास हेक्टरी 90 किलो नत्र, 45 किलो स्फुरद व 45 किलो पालाश द्यावे. यापैकी निम्मे नत्र, सर्व स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावा.6) सरळ वाणाची निवड कोरडवाहू क्षेत्रासाठी केल्यास हेक्टरी 40 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार गरज भासल्यास हेक्टरी 10 किलो झिंक सल्फेट, 10 ते 20 किलो मॅग्नेशिअम सल्फेट व पाच किलो बोरॅक्स पेरणीच्या वेळी द्यावे. याच वेळी 25 किलो गंधक प्रति हेक्टरी दिल्यास 1.5 ते 2.5 टक्क्यांपर्यंत तेलाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.7) पिकास 20, 40 व 50 दिवसांनी 1.5 ग्रॅम युरिया अधिक पाच ग्रॅम डीएपी प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास उत्पादन वाढते.8) सूर्यफूल पिकात हेक्टरी 55,000 रोपांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. शेतकरी पाभरीने किंवा तिफणीने पेरणी करीत असल्याने रोपांची संख्या कमी किंवा अधिक होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. हे टाळण्याकरिता उगवणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. दोन रोपांतील अंतर किमान 30 सें.मी. ठेवावे. पेरणीनंतर 20 व 40 व्या दिवशी खुरपणी व कोळपणी करावी.9) सूर्यफुलास कळी धरणे (30-40 दिवस), फूल उमलणे (55-65 दिवस) व दाणे भरणे या वाढीच्या अवस्थेत पुरेसे पाणी दिल्याने उत्पादनात वाढ मिळते.10) भारी व खोल काळ्या जमिनीत तूर + सूर्यफूल (3-3), सोयाबीन + सूर्यफूल (2-1) व भुईमूग + सूर्यफूल (6-2) या आंतरपीक पद्धती सरस आढळून आल्या आहेत.
बागायती पिकास हंगाम व जमिनीच्या प्रकारानुसार खालीलप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात
सुधारित वाण
1) एल.एस.एफ.- 8सरासरी उत्पादकता - 14 ते 15 क्विं./हेक्टरकालावधी - 90 दिवसतेलाचे प्रमाण - 37 टक्केफुलाचा आकार - पसरटरोगास सहनशील - केवडा रोगास
2) एल.एस.- 11सरासरी उत्पादकता - 14 क्विं./हेक्टरकालावधी - 80 ते 85 दिवसतेलाचे प्रमाण - 36 टक्केफुलाचा आकार - पसरट व जमिनीकडे झुकलेलेरोगास प्रतिबंधक - केवडा रोगास
संकरित वाण
1) एल.एस.एफ.एच.- 35सरासरी उत्पादकता - 16 ते 18 क्विं./हेक्टरकालावधी - 95 ते 100 दिवसतेलाचे प्रमाण - 38 ते 39 टक्केफुलाचा आकार - पसरटरोगास प्रतिबंधक - केवडा रोगास
2) एल.एस.एफ.एच.- 171सरासरी उत्पादकता - 18 ते 20 क्विं./हेक्टर (कोरडवाहू), 21 ते 23 क्विं./हेक्टर (बागायती)कालावधी - 95 ते 100 दिवसतेलाचे प्रमाण - 33.9 टक्केफुलाचा आकार - पसरटरोगास प्रतिबंधक - केवडा रोगास
पेरणीची वेळ, अंतर व बियाणे
पेरणी शक्यतो टोकण पद्धतीनेच करावी. एका ठिकाणी एकच बियाणे टोकण करावे.
Krushi News Ad
Your advertisement here email: macplustech@gmail.com MAC+tech Marketing
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro