Ticker

6/recent/ticker-posts

पीक पेरणीचा योग्य‍ कालावधी

▪️रब्बी ज्वारी ः ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर

▪️सूर्यफूल ः २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर

▪️करडई ः ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर

▪️हरभरा ः ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर

▪️जवस ः २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
रब्बी, pik perni, perni, pic lagwad,pik lagvad,lagwad

🔹उत्पादनवाढीची सूत्रे ः


▪️रब्बी ज्वारी ः


१) हेक्टरी १० किलो बीज प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.

२) पेरणी ४५ सें.मी. इतक्या अंतरावर करावी.

३) पहिल्या २० दिवसांत पिकांची विरळणी करून, दोन रोपांतील अंतर १५ ते १७ सें.मी. ठेवावे.

४) पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, आणि २० किलो स्फुरद जमिनीत खोल पेरून द्यावे.

५) पीक २० दिवसांचे झाल्यानंतर, १० ते १२ दिवसांच्या अंतराने तीन कोळपण्या कराव्यात.


🔹करडई :


१) हेक्टरी १० ते १२ किलो बीज प्रक्रिया केलेल्या प्रमाणित बियाण्यांची पेरणी करावी.

२) पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद जमिनीत खोल पेरून द्यावे.

३) पिकावर माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यावर योग्य वेळी नियंत्रण करावे.

४) पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर, १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात.

५) मररोगाचा प्रादुर्भाव असलेल्या जमिनीमध्ये करडईचे पीक घेऊ नये.


🔹हरभरा ः


१) हेक्टरी ६० ते ६५ किलो रायझोबियम आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूची बीज प्रक्रिया करून बियाण्यांची पेरणी करावी.

२) पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद जमिनीत खोल पेरून द्यावे.

३) पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर, १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ कोळपण्या कराव्यात.


🔹जवस ः


१) मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचऱ्याची, आम्ल- विम्ल निर्देशांक ५ ते ७ या दरम्यान असणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते.

२) बियाणे प्रमाण- हेक्टरी २५ ते ३० किलो

३) बीजप्रक्रिया- कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे

४) पेरणीतील अंतर- दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. असावे.

५) खत व्यवस्थापन-

अ) कोरडवाहू लागवड- हेक्टरी ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद (संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी.)


ब) बागायती लागवड- प्रति हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी) उर्वरित अर्ध्या नत्राची मात्रा पाण्याच्या पाळीच्या वेळी २५ ते ३० दिवसांनी द्यावी.


Source:     ✍️ विनोद धोंगडे नैनपुर ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

🙋‍♂️शेतकरी हितासाठी शेतकरी सुखासाठी

शेअर करा.....🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या