उत्तर :: जैविक कीडनाशकाचा वापर करताना व्हर्टिसिलियम लेकॅनी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे किडीचा प्रादुर्भाव आहे, तेथेच याची फवारणी करावी. फवारणीच्या वेळी हवेत आर्द्रता असायला हवी.
रासायनिक कीडनाशकांचा वापर करताना क्लोरपायरिफॉस (20 टक्के) 30 मि.लि. किंवा बुप्रोफ्रेझीन 20 मि.लि.प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी प्रादुर्भावित पाने, झाडाचे खोड तसेच जमिनीवरदेखील करावी.
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro