अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात हाहाकार माजवला असताना आता तिची नोंद की ऊस पिकात देखील दिसून अली आहे. *ही भारतातील सर्वप्रथम नोंद आहे*..होय आम्ही शेतकरी समूहाचे प्रबंधक प्रसाद पवार(बलवडी) आणि आपल्याच समूहचे सदस्य पंकज पाटील(घोगाव) यांच्या शेतात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ऊस पट्ट्यातील शेतकरी बंधूनी या बाबत सतर्कता बाळगून वेळीच नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे. अशी लक्षणे आपणास दिसत असल्यास त्वरित संपर्क साधावा. होय आम्ही शेतकरी समूहाच्या प्रामाणिक प्रयत्नातून या किडीचा प्रादुर्भाव आपण ओळखू शकलो. त्याबद्दल #Team_HAS तसेच #6th_Grain चे धन्यवाद
*अमोल पाटील प्रकाश खोत* यांनी देखील कष्ट घेऊन या किडीच्या नोंदीत सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार.
Source
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ अंकुश जालिंदर चोरमुले
मो. 8275391731
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro