*कांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी.*
######################
Source:
http://krishiunnati.com/Salla?bid=10709&Source=2
######################
कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी करावी. तसेच २०० लिटर पाण्यात एक किलो कॅल्शियम नायट्रे ट पिकाच्या २५/४०/५० व्या दिवशी फवारावे. अशा प्रकारे पिकाची वाढ नियंत्रित करून पिकाचा दर्जा आणि उत्पादन वाढविता येते.
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro