जिप्सम म्हणजे काय ?
जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुयधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते.
फायदेः
जिप्समच्या वापरामुळे होणारे फायदे -
1. जिप्सममुळे जमीन भुसभुशीतहोऊन जमिनीची सुपीकता वाढवते.
2. जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
3. क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात व ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
4. बियाण्याची उगवण चांगली होते.
5. जमिनीची धूप कमी होते.
6. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
7. जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
8. जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
9. भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
10. जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
11. जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
12. जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
13. जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
14. जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.
Source:
MAC+tech Agri
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro