Ticker

6/recent/ticker-posts

झिंक

झिंक :                           
पिकातील ऑक्झिन्स च्या
निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे.
पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी
गरजेच्या इंडॉल अँसेटिक अँसिड ची
निर्मिती ही झिंक पासुन होते.
त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अँमिनो अँसिड
कार्य करते, जे झिंक च्या वापराने तयार
होते.
पिकाची नत्राचे दुष्परिणाम न भोगता,
शाकिय वाढ करावयाची झाल्यास
झिंक व मॅग्नेशियम सल्फेट चांगले पर्याय ठरु
शकतात.
झिंक हे प्रथिनांच्या निर्मितीस चालना
देणा-या एन्झाईम्स ला उत्तेजित करतात.
तसेच झिंक हे पिकाव्दारा निर्मित
साखरेच्या वापरासाठी गरजेचे आहे. झिंक
हे स्टार्च च्या निर्मितीत गरजेचे आहे.
ज्यामुळे झिंक फळांच्या विकासात
देखिल कार्य करित असतात.
झिंक मुळांच्या वाढीसाठी देखिल गरजेचे
आहे. पिकाच्या पक्वतेवर झिंक परिणाम
करते. पिकातील हरितलवक आणि
कर्बोदकांच्या निर्मितीसाठी झिंक
गरजेचे आहे. पिकांत उचित मात्रेत झिंक
असल्यास पिक कमी तापमान सहन करु
शकते.
ज्या जमिनीत झिंक चे प्रमाण कमी असते,
अशा जमिनीत पिकाच्या मुळांवर हल्ला
करणारे रोग यांचे प्रमाण जास्त असते.
झिंक कमतरता असलेल्या पिकास
मुळांवरिल रोग हे जास्त प्रमाणात
होतात.
पिकाच्या मुळांव्दारा झिंक चे शोषण हे
डिफ्युजन तंत्राने केले जाते. झिंक आणि
कॉपर पिकांत एकाच जागेवरुन शिरत
असल्या कारणाने दोघांत पिकांच्या
मुळांत शिरण्यासाठी स्पर्धा निर्माण
होते. पिक झिंक हे Zn⁺⁺ च्या स्वरुपात
शोषुन घेते.
झिंक जास्त सामू असलेल्या जमिनीत
उपलब्ध होत नाही, मात्र हे सर्वच
जमिनींवर होत नाही, झिंक सल्फेट,
किंवा तत्सम अँसेडिक खतांच्या
माध्यामातुन आणि मुळांच्या परिसरात
झिंक देवुन हि कमतरता दुर करता येते.
जमिनीतील स्फुरद चे जास्त प्रमाण झिंक
चे शोषण कमी करते.
जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिक
चे चिलेशन करतात, ज्यामुळे झिंक चे
कार्बोनेटस, बायकार्बोनेटस सोबत
होणारे स्थिरकरण कमी होते व पिकांस
उपलब्धता वाढते.
पिकांस नत्राची कमतरता असल्यास
साहजीकच पिकाची वाढ कमी होते, व
त्यामुळे ईतर अन्नद्रव्यांची देखिल कमतरता
जाणवते, ज्यात झिंक चा देखिल समावेश
होतो.
मॅग्नेशियम च्या वापराने झिंक चे शोषण
देखिल वाढते.
मका, कापुस, फळ पिके, मधु मका, ज्वारी,
कडधान्ये, भात या पिकांस झिंक
दिल्यास उत्पादनात वाढ होते.
Source
MAC+tech Agro

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या