Ticker

6/recent/ticker-posts

बी. टी. कापूस विशेष बाबी

बी. टी. कापूस  विशेष बाबी
######################
Source
-इरफ़ान शेख,बीड
######################
१) ज्या जमिनीची खोली २ फूट किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या जमिनीत कापसाची लागवड करावी. 
२) जमिनीचा सामू ८.५ पेक्षा जास्त व सेंद्रिय कर्ब ०.२ टक्के पेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत बी. टी. कापसाची लागवड टाळावी. 
३) चिबड, पाणथळ, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन लागवडीसाठी निवडू नये. 
४) पीक नियोजनामध्ये गतवर्षी किंवा पुढील वर्षी हरभरा, भेंडी, अंबाडी व टोमॅटोची लागवड केली असेल किंवा करणार असल्यास अशा जमिनीतही कापूस लागवड टाळावी. गेल्यावर्षी बी. टी. कापसाचे पीक घेतलेल्या ठिकाणी चालू हंगामात बी. टी. कापसाची लागवड शक्यतो टाळावी. 
५) कापूस लागवडीपूर्वी सेंद्रिय खत किंवा चांगल्या कुजलेल्या शेणखताची उपलब्धता लक्षात घ्यावी. सेंद्रिय खताची उपलब्धता नसल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते. पिकासाठी माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. त्यासाठी आवश्‍यक त्या अन्नद्रव्याची उपलब्धता करून घ्यावी. 
६) फुले लागणे व बोंड भरते वेळेस ओल्याव्याची आवश्‍यकता असते. या कालावधीत पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या दोन्ही संवेदनशील अवस्थांसाठी संरक्षित पाण्याची सोय अथवा तजवीज करावी. 
७) बी. टी. कापसावर रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी सापळा पिकांची लागवडही करावी. त्याचप्रमाणे बी. टी. कपाशीमध्ये येणाऱ्या रोगकिडींचा अंदाज घेऊन एकात्मिक कीड नियंत्रणाच्या उपाययोजना राबवाव्यात. 
८) गतवर्षी २,४ डी या तणनाशकाची फवारणी केलेली असल्यास त्या ठिकाणी बी. टी. कापसाची लागवड करू नये. 
९) आपल्या शेताच्या वरील बाजूने पाणी येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात २,४ डी या तणनाशकाची फवारणी संबंधित शेतकरी करणार असेल, तरी त्या ठिकाणी कापसाची लागवड करू नये. 
१०) कापसाच्या शेताशेजारील शेतकरी पिकामध्ये २,४ डी या तणनाशकाची फवारणी करणार असेल तर त्या ठिकाणीसुद्धा वाऱ्याच्या प्रवाहामुळे कापसावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 
११) कापसाचे बियाणे व २,४-डी तणनाशक अधिक कालावधीसाठी एकत्र ठेवू नये. त्याचाही कापूस पिकावर नकारात्मक परिणाम होतो.
१२) सर्वात महत्वाचे बी टी कापूस पिकाच्या भोवताली नॉन बी टी वाणाच्या ओळी नक्की लावाव्यात.

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru 
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या