Ticker

6/recent/ticker-posts

कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय काजी सांगवी येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.

कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय काजी सांगवी येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.
काजीसांगवीः उत्तम आवारे पत्रकार

        मराठा विद्या प्रसारक समाजाचे , कै.नरहरपंत  कारभारी ठाकरे जनता विद्यालय 

व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा  जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.

  ----------------------------------------

             कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर हे होते.व्यासपीठावर पर्यवेक्षक सुभाष पाटील, जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर, ठाकरे,सतीश महाले,सीताराम खुटे,दर्शना न्याहारकर,शोभा जाधव उपस्थित होते.

           विद्यालयाचे गणित शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून श्रीनिवास रामानुजन यांचा जीवन परिचय करून दिला.तसेच विद्यालयातील रोहिणी आवारे,रोशनी ठाकरे,प्राची आहेर,स्वरूपा काळे,तेजस खडताळे,सिद्धेश ठाकरे,ओम ठोके,ऋषिकेश सोनवणे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्राविषयी भाषणे केली.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पायल ठोंबरे हिने केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी १०वी (अ) चे विद्यार्थी व वर्गशिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या