रब्बी पीक व्यवस्थापन
- ज्वारी - खोडकीड नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२५ ईसी) १५ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
- तूर - शेंगा पोखरणाऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) २० मिलि प्रति १० लिटर प्रमाणे फवारणी करावी.
- लिंबूवर्गीय पिके - मावा किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिलि किंवा अॅसिफेट (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) १५ ग्रॅम प्रति १० लिटर प्रमाणे फवारणी करावी.
- ऊस - पूर्वहंगामी उसाला खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी २ या प्रमाणे फुले ट्रायकोकार्डची १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ प्रसारणे करावीत.
गहू -
- गव्हाची पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी.
- गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी एन. आय. ए. डब्ल्यू -३०१ (त्र्यंबक), फुले समाधान, एन.आय.ए. डब्ल्यू.- ९१७ (तपोवन), एन.आय.ए. डब्ल्यू.-२९५ (गोदावरी) या वाणांचा वापर करावा.
- बागायती उशीरा पेरणीसाठी, एन.आय.ए. डब्ल्यू.-३४, जिरायत पेरणीकरिता एन.आय.ए. डब्ल्यू.-१५ (पंचवटी) या वाणांचा वापर करावा. हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणीवेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश या प्रमाणे खतांचा वापर करावा.
वांगी
- वांगी पिकावरील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक कीडनियंत्रण खालील प्रमाणे करावे.
कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकावेत व नष्ट करावेत.
- तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
- ल्युसी ल्युर कामगंध सापळे हेक्टरी १०० या प्रमाणात वापरावेत. त्यातील ल्युर दर दोन महिन्यांनी बदलावा.
- अळीच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति १० लिटर पाणी)
इंडोक्झाकार्ब १० मिलि किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ३ मिलि
वाल
या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, डायमिथोएट (३० ईसी) १५ मिलि अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर या प्रमाणे फवारावे.
टोमॅटो
- लागवडीनंतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येईल. त्यांच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रिड ५ मिलि किंवा थायामिथोक्झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिलि किंवा डेल्टामेथ्रीन (१ टक्का ईसी) अधिक ट्रायझोफॉस (३५ ईसी) (संयुक्त कीडनाशक) २० मिलि प्रति १० लिटर या प्रमाणे फवारणी करावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यास या सोबत मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर मिसळावे.
भेंडी
- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, इमिडाक्लोप्रिड ४ मिलि किंवा थायामेथोक्झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, तोडणीनंतर किडकी फळे जमिनीत पुरावीत. झाडांवर डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ७ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ६ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
काकडी, कारली व दुधी भोपळा -
या वेलवर्गीय पिकांवर फळमाशींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास...
- क्यु ल्युरचे सापळे एकरी पाच या प्रमाणे लावावेत.
- मॅलॅथिऑन २० मिलि अधिक गूळ १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.
- केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम अधिक स्टिकर १० मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांनी करावी.
०२४२६- २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro