काजी सांगवी येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न
काजीसांगवी (उत्तम आवारे पत्रकार):सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी समाज कार्य करत असते
सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा वेळी रक्तदात्यानी पुढं यावे अशी हाक राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दिली त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार ,नाशिक टीम ने या मानवतेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत सद्याच्या परिस्थितीत माणुसकीचा झरा या भावनेतून आज नाशिक परिवारा तर्फे काजी सांगवी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
*या शिबिरात ६२ रक्तदाते यांनी आपले रक्तदान केले. अनेक रक्तदाते रक्तदानास येऊनही काही वैयक्तिक अडचणी मुळे रक्तदान करू शकले नाही*.
हे शीबीर यशस्वी होण्यास सकल मराठा परिवार टीम आणि सकल मराठा परिवार ग्रुप चे सर्व सदस्य यांनी मनस्वी प्रयत्न केले सर्व सदस्यांचे आम्ही शतशः ऋणी आहे आपण आमच्या वर जो विश्वास दाखवला तो आम्ही नेहमी सार्थ करू आपली साथ नेहमी आमच्या सोबत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या कॅम्प साठी शांतिधाम मंदिर भजनी मंडळ व गणेश ठाकरे यांनी डोनर साठी नास्तापानी ची सोय केली तर नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले
सकल मराठा परिवार नाशिक ॲडमिन टीमचे खंडू आहेर, दत्ता काळे, आनंद पाटील ,चेतन घुले , शरद दवंडे ,किरण शिंदेयांच्या सह काजी सांगवी ग्रामस्थ आदि टीम ने मेहनत घेतली
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro