चांदवड (दशथ ठोंबरे) 5 Dec 2022 :- तालुक्यातील दिघवद येथे प्रहार प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके सरपंच उत्तम झाल्टे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक शासकिय जिल्हा रुग्णालय व प्रहार जनशक्ती पक्ष चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकयातील दिघवद येथिल हनुमान मंदीरच्या सभामंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुकयातील70 ते 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या जाताना अल्पस आहार व प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण राम बोरसे ,रेवन गांगुर्डे, वैभव गांगुर्डे, कैलास पगार, महेश गांगुर्डे ,सागर गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, मिननाथ निखाडे, बापू शेळके, रावसाहेब गांगुर्डे, गंगाधर गांगुर्डे आदिनी परिश्रम घेतले.
---
krushinew.com
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro