चांदवड (दशरथ ठोंबरे) :-पूर्वी पाऊस येण्याचे काही ठोकताळे होते.शेतकरी वर्ग त्यानुसार पेरणी करीत असे आणि त्या वेळी शेतकर्यांनी अंदाज केल्याप्रमाणे पाऊस बरसत असे.काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली,सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला.त्यामुळे एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ढगफुटीच्या प्रमाणात वाढ असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी आपले जुने तंत्राचा वापर करुन. शेतकरयानी हवामाच्या अंदाजावर शेती उत्पादन घ्यावी असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी चांदवड येथे प्रहारचे गणेश निंबाळकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम चे अध्यक्ष पंजाब डख व प्रमुख पाहुणे म्हणून युटयुबस्टार गणेश फरताळे, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख शरद शिंदे,गणेश निंबाळकर, निरीक्षक सुरेश उशीर तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण ,राम बोरसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी प्रमुख अथिती हस्ते दिप प्रज्वलन व शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन करुन करुन कार्यक्रमास सरुवात झाली
हवामानातील बदल व पाऊस पाणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले पाऊस येण्याची काही लक्षणे आहेत.दिवस मावळत असतांना आकाश तांबडे झाले तर 72 तासात पाऊस येतो.गर्मी वाढल्यास बहात्तर तासात पाऊस येण्याची शक्यता असते तसेच चिमण्यांनी धुळीत आंघोळ केल्यास 72 तासात पाऊस येतो.जेव्हा पावसाचे ढग वाहतांना विमानासारखा आवाज येतो तेव्हा पाऊस येणार असे निश्चित समजावे. कावळ्याने आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर केल्यास समजावे की यावर्षी पावसाळा कमी होणार आहे, झाडाच्या मध्यभागी केल्यास समजावे पावसाळा जास्त होणार आहे. पीकावर बुरशी कधी पडते व मान्सूनचा पाऊस कधी दाखल होतो याबाबतचे काही ठोकताळे पंजाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.तसेच गणेश फरताळे यांनी शेतकरयावर होणारया अन्याबाबत मार्गदर्शन केले . तसेच गणेश निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून महावितरण केलेला शेतकऱ्यांचा छळ व चांदवड भूमी अभिलेख कार्यालयाकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक याविषयी ताशेरे ओढले शेतकऱ्यांच्या विषयांना वाचा फोडण्यासाठी तालुक्यात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. यावेळी रेवन गांगुर्डे, वैभव गांगुर्डे
सोमनाथ जाधव, गणेश तिडके, कैलास पगार, शिवा गुंजाळ, हरिभाऊ महाजन, गणेश काकुळते, साहेबराव गांगुर्डे, चंद्रभान गांगुर्डे, संदीप देवरे, किरण चरमळ, सुनील पाचपुते, अमोल फरताळे, शंकर गायके, संदीप महाराज जाधव, विनोद जाधव, प्रवीण जाधव, मिनीनाथ निखाडे, चंद्रकांत जाधव, शांताराम घुले, हरिभाऊ सोनवणे, प्रवीण लबडे, बापू खांदे, संदेश आहेर, रवि आहेर, वैभव गांगुर्डे, गौरव पवार, गोरख ढगे, किरण काळे, गणेश गांगुर्डे, विक्रम ठाकरे, बापूसाहेब भोकनळ, भगवान पाचोरकर, संतोष आंबेकर, विजय तिडके, संदीप चव्हाण, बापू पवार, आदिसह शेतकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro