🛑रब्बी सोयाबीन बाबत माहिती🛑
सोयाबीन # रब्बी मध्ये घ्यावे की नाही घ्यावे # नेमके केव्हा घ्यावे # बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेलेआहेत # त्यामध्ये प्रामुख्याने बरेच लोक सोयाबीन हिवाळ्यात येते म्हणतात असे अनेक व्हिडिओ सुद्धा युट्यूबला आहेत. कोणाचा हेतू काय असेल माहीत नाही सोयाबीन हिवाळ्यात येते की नाही येत हे महत्वाचे आहे, आणि त्यापेक्षाही ते हिवाळ्यात घ्यावे की नाही घ्यावे हे जास्त महत्त्वाचं आहे # किंवा घ्यायचेच असेल तर केव्हा पेरणी केली पाहिजे, आणि कोणते वाण वापरले पाहिजेत, याविषयी सर्व शेतकरी संभ्रमात आहेत त्यांच्यासाठी हा लेख 👉🏻
सोयाबीन हे उष्ण व आद्रयुक्त हवामानात,तसेच १८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात येणारे पीक आहे, थंड व कोरड्या हवामानाचा सोयाबीन पिकाच्या वाढीवर व फुल धारणेवर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे हीवाळ्यामधे सोयाबीन पिकाची वाढ होत नाही व फुलधरणा होत नाही.
👉🏻
मुद्दा १. सोयाबीन हे शॉर्ट डे प्लांट आहे, त्यामुळे सोयाबीन पिकला फोटोपिरेड हा कमी लागतो व त्याला अनुकूल तापमान आवश्यक असते ( २५-३० अंश सेल्सिअस). हिवाळ्यात फोटोपिरेड जास्त असतो ( Active Sunlight Hours) व तापमान कमी असते याचा परिणाम सोयाबीन वर असा होतो की त्यामुळे सोयाबीन पिकला photoperiod जास्त भेटतो व त्यामुळे पूनृत्पादक वाढ थांबते व याचा झाडाच्या वाढीवर व फुळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी गुच्छ / झूडप यांसारखे सोयाबीन चे झाडे आढळून येतात. त्यामुळे शास्त्रीय दृष्टया हिवाळी / रब्बी हंगामात सोयाबीन लागवडीची शिफारस करता येत नाही.
👉🏻
मुद्दा २. शिफाशीप्रमाणे सोयाबीन हे खरीप आणि उन्हाळी हंगामात म्हणजे ( late Rabi ) मध्ये घेतल्या जाते ; प्रामुख्याने उन्हाळी सोयाबीन हे बियाणे तुटवडा असल्यामुळे घेतल्या जाते परंतु काही ठिकाणी चांगले उत्पादन आल्यामुळे उन्हाळी सोयाबीन येते हे सिद्ध झाले आहे आणि तसे संदर्भ सुद्धा उपलब्ध आहेत.
त्यामुळे उन्हाळी म्हणजे ( late Rabi) सोयाबिन आपण पेरू शकतो म्हणजे ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत ( त्यापेक्षा उशिरा नाही ) ( १५ जानेवारी चांगली वेळी ) .
👉🏻
मुद्दा ३. जरी सोयाबीन हिवाळ्यात लावले तरी त्याला पाहिजे इतके उत्पादन मिळणार नाही हे मात्र नक्की आहे ; त्याऐवजी हिवाळी पिके हरबरा # गहू # वाटाणा # मका # कांदा यांची लागवड केली तर जास्त उत्पन्न मिळू शकते ; त्यामुळे हिवाळी सोयाबीन लागवड करणे टाळावे.
👉🏻 डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी मध्ये जर जास्त थंडी पडली तर सोयाबीनची वाढ होणार नाही व फुले लागणार नाहीत आणि शेंगा व्यवस्थित भरणार नाहीत त्यामुळे उत्पादन कमी येईल # परंतु जर थंडी पडली नाही तर उत्पादनावर तेव्हडा परिणाम होणार नाही # थंडी पडेल नाही पडेल हे निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे काही ठिकाणी हिवाळी सोयाबीन येऊ शकते. परंतु त्याचा विचार करणे आपल्याला परवडणार नाही.
👉🏻सोयाबीन लावयचीच असेल तर जानेवारी मध्ये लावा # लागवडी साठी लवकर येणारे किंवा मध्यम कालावधीत येणारे वाण JS-९३०५, RVS-१८, JS-३३५, Phule Kimya किंवा PKV-१००३९ यापैकी व मागील वर्षीच्या शेतकरी अनुभवानुसार वाण निवडावेत. लागवड करताना अंतर कमी ठेवले तरी चालेल ( खरीप च्या तुलनेत ). बियाण्याचे प्रमाण जास्त वापरावे लागेल खरीप सोयाबीन पेक्षा, कारण उन्हाळी सोयाबीन ची वाढ थोडी कमी होते.
वरील माहिती ही शास्त्रीय व अनुभव यानासुर लिहिली आहे. शेतकरी वर्गात असलेल्या हिवाळी सोयाबीन लागवडीचा संभ्रम दूर करण्यासाठी हा लेख आहे.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro