Ticker

6/recent/ticker-posts

१९ आँगस्ट जागतिक छायाचित्रण दिन... उत्साहात साजरा

१९ आँगस्ट जागतिक छायाचित्रण दिन... उत्साहात साजरा....  



    काजीसांगवीः उत्तम आवारे      चांदवड तालुका छायाचित्रकार संघटना चांदवड  आयोजित छायाचित्रण दिना निमित्त णमोकार तिर्थ येथे... लक्ष्मी पूजन व कॕमेरा पूजन सर्व छायाचित्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आले. 


           याप्रसंगी छायाचित्रण व्यवसाय आणि समस्या याविषयावर खुले चर्चासत्र घेण्यात येऊन अनेक व्यावसायिक समस्यांवर चर्चा घेण्यात आली. चांदवड तालुक्यातील अनेक छायाचित्रकार बांधवांनी आपले अनुभव व्यक्त केले.


       सर्व छायाचित्रकार बांधवांनी णमोकार तिर्थ येथिल प.पु. गुरूदेव आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचे शुभाशिर्वाद घेतले. महाराजांनी सर्व छायाचित्रकार बांधवांना शुभेच्छा व व्यावसायिक बांधिलकी सोबतच सामाजिक जाणिव जागृती देखील जपण्याचा सल्ला देत शुभाशिर्वाद दिले.



          याप्रसंगी चांदवड तालुका छायाचित्रकार संघटनेचे संस्थापक श्री आनिल राऊत ( पिंटू ) व संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री राजकुमार जाधव यांनी सर्व छायाचित्रकार बांधवांशी संवाद साधला.


        मधुकर जाधव , ज्ञानेश्वर पवार , सुमित गांगुर्डे , रूपेश पवार , स्वप्नील शेलार , महेश गुजराथी , श्री जोपुळकर , कृष्णा पवार , अक्षय , निवृत्ती जाधव , संजय पाडवी व अनेक छायाचित्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या