Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली,येथे महाराष्ट्र।राज्य प्रदेश युवा सचिव पदी युवाकिर्तनकार ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांची नियुक्ती

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली,येथे महाराष्ट्र।राज्य प्रदेश युवा सचिव पदी युवाकिर्तनकार ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांची नियुक्ती....काजीसांगवीः- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली (भारत) "महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा सचिव" म्हणून वारकरी संप्रदायायातील युवा नेतृत्व,वारकरीभूषण ह.भ.प.गोकुळ धोंडीबा गांगुर्डे उर्फ "ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे" यांची नियुक्ती जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननिय श्री राजेंद्रजी आहेर साहेब,महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संतसेवक ह.भ.प.माऊली महाराज सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करून निवड करण्यात आली.अत्यंत होतकरू व्यक्तीमत्व व तरुण चेहरा,सर्वसामान्य जनतेशी दांडगा जनसंपर्क अशी ओळख असणारे ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांच्यावर अत्यंत मोठी जबाबदारी दिल्यामुळे सर्व क्षेत्रातून व माध्यमातून त्यांचे अभिनंदन होत आहे,यावेळी नवनाथ महाराज बोलताना म्हणाले की,माझ्यावर जो विश्वास दाखवला याचा आम्हां सार्थ अभिमान आहे,माझ्या हातून या पुढील ही काळात तळागाळातील सर्वसामान्य जनतेची जास्तीत जास्त सेवा घडावी,हिच खरी ईश्वरसेवा होईल यानिमित्ताने जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन टीम व सर्वांचे जाहीर आभार मानतो असे त्यावेळी त्यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या