जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम योजना सन 2022-23
दिघवदः (कैलास सोनवणे) महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत 2014-15 पासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे..सन 2022 -23 मध्ये राबविन्याकरता जिल्हास्तरावर समितीने मान्यता दिली आहे. हमखास सिंचनाखाली न येणाऱ्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्यांच्या कोरडवाहू क्षेत्रातील कृषि शेतीबाबत आत्मविश्वास वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेअंतर्गत गाव बैठका घेऊन चांदवड तालुक्यातील उर्धुळ या गावाची निवड करण्यात आली आहे. सदर ग्रामसभेस उर्धुळ गावातील सरपंच मा.सौ.कविता ठाकरे ,उपसरपंच सौ मिरा ठाकरे ,सर्व सदस्य पदाधिकारी व गावातील प्रगतिशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थीत होते. तसेच मा. विलास सोनवणे तालुका कृषी अधिकारी चांदवड, श्रीमती मनिषा जाधव मंडळ कृषी अधिकारी चांदवड ,सुरेखा पाटील कृषी सहायक उर्धुळ यांनी उपस्थितांना योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कृषी मित्र निवृत्ती ठाकरे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाचे सहकार्य केले. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती रक्कम रुपये 1.78 लाख, अनुसूचित जमाती रक्कम रुपये 2. 67 लाख व सर्वसाधारण प्रवर्ग करिता रक्कम रुपये 8.35 लाख एकूण रक्कम रुपये 12.3 शिल्लक निधी चा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये दुग्धोत्पादन पशुधन आधारित शेती पद्धती शेडनेट हाऊस काढणीपश्चात साठवण तंत्रज्ञान या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे..... सदर योजनेत जास्तीत जास्त उर्धुळ या गावातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री विलास सोनवणे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro