Ticker

6/recent/ticker-posts

दहीवद ग्रामपंचायतवर प्रहारचा झेंडा

दहीवद ग्रामपंचायतवर प्रहारचा झेंडा 
काजीसांगवीः (उत्तम आवारे) चांदवड तालुकयातील दहीवद ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन व ग्राम विकास पँनल मध्ये समोरासमाेर चुरशीची लढत होऊन परिवर्तन पँनलने ग्राम विकास पँनलचा धुवा करत पाच जागावर प्रहार पक्षाचा झेंडा फडकविसला 

दहीवद येथिल ग्रामपंचायतच्या सात जागासाठी निवडणुक घेण्यात आली.त्यात प्रहारचे उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पँनल तर बाजार समीतीचे माजी  सभापती भागवत आण्णा जाधव यांच्या नेतृत्वा खाली ग्राम विकास पँनलची निर्मीती होऊन दोन्ही पँनलमध्ये चुरशीची लढत होऊनप परिवर्तन पँनलने ग्राम विकास पँनलचा धुवा करत पाच जागावर विजय मिळविला त्यात परिवर्तन पँनलच्या कंसात मिळालेली मते वार्ड एकमधुन रत्ना तानाजी खांदे (116),दिपाली गणेश निंबाळकर (135),वार्ड दोन मधुन गणेश रमेश निंबाळकर( 121),छाया किशोर वाघमोडे(107),तर वार्ड तीन मधुन अपक्ष असलेले सतोष नामदेव केदारे(55), वच्छला बबन केदारे (52),आदि उमेदवार विजयी झाले तर ग्राम विकास पँनल हिराबाई वाघमोडे, पुनम जाधव, सोपान आरतनुर, मीराबाई निंबाळकर, तर परिवर्तन पँनलचे मनिषा केदारे, सविता जाधव, अपक्षअसलेले बाळासाहेब वाघमोडेआदिचा पराभव झाला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या