Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या भाषणाची व कलेची घेतली दखल

विद्यार्थ्यांच्या भाषणाची व कलेची घेतली दखल...


काजीसांगवीः (उत्तम आवारे) जिल्हा परिषद शाळा एकरुखे येथे श्री. सोमनाथ  एकनाथ धनाईत( विश्वस्त केद्राई माता देवस्थान ट्रस्ट) यांनी सदिच्छा भेट दिली....15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद शाळा एकरुखे येथे वकृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा या मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा एक व्हिडिओ व्हाट्सअप च्या माध्यमातून प्रसारित झाल्यावर श्री सोमनाथ धनाईत (खडक ओझर) यांनी दखल घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी व मनोबल, उत्साह वाढवण्यासाठी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांना काही रोख स्वरूपात बक्षीस वितरण केले.आपल्या मूळ गावातील शाळा ,विद्यार्थी  यांच्या विषयी असलेली आपुलकी आणि जिव्हाळा यामुळे श्री सोमनाथ धनाईत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. श्री सोमनाथ धनाईत यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे.


यावेळी सरपंच सौ. अनिता जाधव , पोलीस पाटील संपतराव जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय रौंदळ , शालेय व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, शिवलिंग धनाईत, भीमराव धनाईत, प्रवीण रौंदळ,दीपक धनाईत, सोमनाथ धनाईत, योगेश धनाईत ,ठोंबरे भाऊ ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका श्रीमती थेटे मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. रंजना खैरनार मॅडम आणि त्यांच्या सहशिक्षिका श्रीमती वैशाली जाधव मॅडम उपस्थित होत्या.

शेवटी गावचे पोलीस पाटील श्री संपतराव जाधव यांनी विद्यार्थ्यांचा कलागुणांचे  कौतुक करून त्यांना प्रेरणा देणाऱ्या श्री सोमनाथ धनाईत यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या