Ticker

6/recent/ticker-posts

आल लागवड

आलं लागवड     
माती:-
खोल चांगल्या निचऱ्याची,भुसभुशीत चिकट माती तसेच काळी माती आल्यासाठी उत्तम असते.
हवामान: 
दमट हवामान लागवडीसाठी चांगले असते,
कंदाच्या योग्य वाढीसाठी थंड आणि कोरडे हवामान श्रेयस्कर असते.
आल हे प्रामुख्याने सावलीत येणार पिक आहे, आल्याला मुबलक प्रमाणात आलावा मिळाला तर त्याची वाढ चांगली होते.
आले लागवड माहिती,आले लागवड,आले लागवड कशी करावी,आद्रक लागवड,आले लागवड खत व्यवस्थापन,आले लागवड पद्धत,आले लागवड व्यवस्थापन,आले लागवड तंत्र,आले लागवड कशी करायची,आले लागवड माहिती pdf,आद्रक लागवड माहिती,आले पीक लागवड,आले लागवड ते प्रक्रिया उद्योग,आले लागवड तंत्रज्ञान,आले लागवड यंत्र,अद्रक लागवड,आले लागवड pdf,आल्ले लागवड,अद्रक लागवड माहिती,अद्रक लागवड कशी करावी,आले लागवड agrowon,आले लागवड ते करोडपती,लागवड आले,आले लागवड माहिती तंत्रज्ञान,अद्रक लागवड कशी करायची,आद्रक लागवड पूर्वतयारी,आल्याची लागवड

लागवाडीसाठी योग्य वेळ-
मार्च ते एप्रिल ( एप्रिलचा शेवटचा आठवडा)
जमिनीची मशागत:
उन्हाळ्यात जमीन दोन वेळेस तिरपी नांगरुन घ्यावी.
तसेच माती मोकळी आणि भुसभुशीत बनवण्यासाठी  कुळवाच्या (फणाच्या) ३-४ तिरप्या पाळ्या घ्याव्यात.
शेवटच्या फणणी अगोदर १५ टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकावं.

लागवड:
आल्याची लागवड करताना निकोप /निरोगी कंदांची निवड करावी
कंद २.५ ते ५ से मी आकाराचे हवेत. त्यांचं वजन २०-२५ ग्रॅम असावं,
२-३ डोळ असलेले कंद निवडावे.लागवडीची वेळ: एप्रिलचा शेवटचा आठ्वडा ते मे चा पहिल्या पंधरवडा.
बीज दर: १५००किलो प्रति हेक्टर कंद
कंदांमधील अंतर- ३० × २२.५ सेमी
खोली- १०-१२ सेमी
लागवड करण्याअगोदर हे कंद बुरशीनाशकाने प्रक्रिया करून घ्यावे.
प्रक्रिया केलेले कंद सावलीत खड्डे करून त्यात पाने टाकुन त्यावर पसरावे.अस केल्याने कंदांची उगवण क्षमता वाढते आणि आद्रता कमी व्ह्ययला मदत होते.

लागवड पद्धती:-
सरी वरंबा पद्धत : सिंचनाखालील पीकासाठी ७५ सें.मी.
वाफा पद्धत : २०-३० × २०-३० सें.मी. (२५ ×२२.५ सें.मी.)
गादी वाफा पद्धत : ३० × ३० सें.मी.
नविन सुधारित तंत्रज्ञान : विस्तृत सारा पद्धत ७५ सें मी विस्तृत, २०-३० सें मी ऊंच आणि ३० सें मी लांबी असलेल्या सऱ्यांवर आल्याची लागवड
लागवड़ी अगोदर  जमिनीला पाणी द्यावे आणि वापसा असताना लागवड़ करावी.
लागवडीच्या वेळेस डोळ वरती राहतील याची काळजी घ्यावी.

पाणी व्यवस्थापन:-
लागवड़ी नंतर लगेच एक पाणी द्यावे,
दर १० दिवसांच्या अंतरातवर पाणी द्याव.

खत व्यवस्थापन:-
जमीन तयार करताना १५ टन प्रति हेक्टर आणि लागवड करताना १५ टन प्रति हेक्टर शेनखत टाकावे.
लागवदीच्या वेळी ६०किलो नत्र, ५०किलो स्पुरद, ५०किलो पालश प्रति हेक्टर.
लागवड़ी नंतर ४५ दिवसांनी ५० किलो आणि १२० दिवसांनी ४० किलो नत्र द्याव.

आंतरमशागत:-
पहिल्या ४-६ आठवड्यात नींदणी करावी.
कंदांच्या योग्य वाढीसाठी झाडांना भरावा द्यावा.
                - दिपाली सोनवणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या