अतिवृष्टी भागाची आमदार राहुल आहेर यांच्याकडून पाहणी
अतिवृष्टी भागाची आमदार राहुल आहेर यांच्याकडून पाहणी काजीसांगवीः चांदवड तालुकयातील दक्षिण भागातील गावामध्ये दि. 11रोजी सांयकाळी4वाजेच्या दरम्यान ढगफुटीदृश्य पाऊस पडल्याने परिसातील शेतातील पीकाचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीची पाहणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसुल विभागाला दिले. तालुकयात सततच्या पडणारया पाऊसाने बहुतांशी भागात शेतकरयाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले असुन दि 11रोजी सांयकाळी 4वाजेच्या दरम्यान तालुकयाच्या दक्षिण पटयातील पिपंळद, हिरापुर, वाळकेवाडी उर्धुळ आदि परिसारातील गावात ढगफुटी दृश्य पाऊस पडल्याने शेतातील पीके पाण्याखील गेल्याने पीकचे मोठे नुकसान झाले .तसेच शेतातील सोयाबीन,बाजरी, मुग, मका,टोमँटो, कांदा रोपे, लागवड केलेली कांदे आदी पीकाचे पावसाच्या पाण्याने मोठे नुकसान झाले. तसेच काही भागात जमीन वाहुन गेल्याचे प्रकार घडला व काही गावाचा पुरपरिस्थितीने संपर्क तुटला. परिसरात नुकसान झालेल्या भागातील पीकाची आमदार डॉ. राहुल आहेर, यांनी पाहणी करुन नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडी पंचनामा करण्याचे आदेश दिले. यावेळी चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील पंचायत समीती माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे,तलाठी शिवाजी नेवल, प्रकाश गोसावी, कृषी साहय्यक अर्जना देशमुख, आत्माराम मोहीते, विलास धाकराव, हेमत वाळके, अजय लोढे गुणवंत ठोके सरपंच आर डी थोरात ,बाळा चव्हाण ,दिनकर चव्हाण, किसन चव्हाण बाजीराव वानखेडे, नंदु टोपे, रमण टोपेआदि उपस्थित होते
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro