हरिनाम सप्ताहाच्या सांगतेत बाल वारकरी ठरले आकर्षण
काजीसांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुक्यातील रेडगाव येथे स्वामी यादव महारांजाच्या पुण्यस्मर्णार्थ आयोजित 38व्या हरिनाम सप्ताहाच्या सांगतेत सहभागी बाल वारकरी उपस्थितांचे आकर्षण ठरले.
निरपेक्ष व निस्वार्थ वृत्तीने वारकरी संप्रादयाची पताका घेऊन जिल्ह्यातील शेकडो नागरीकांना सन्मार्गाला लावणारे रेडगाव खुर्द ता. चांदवड येथील थोर सत्पुरुष स्वामी यादव महाराज याच्या पुण्यस्मर्णार्थ आयोजीत 38वा हरिनाम सप्ताह संपन्न झाला.यात पंढरपुर येथील अनुक्रमे संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज कबीर, विष्णु महाराज टेंभुरकर, संत एकनाथ महाराजांचे वंशज पुष्कर महाराज गेसावी, भागवत महाराज शिरवळकर, चैतन्य महाराज वासकर, संत तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज देहुकर, राम महाराज झिंजुर्के याची किर्तने झाली. सप्ताहाच्या सांगतेवेळी दिडी सोहळा झाला यात येथील जि.प. शाळेच्या मुलांचे विठ्ठल-रुख्मीनी सह परंपरागत वारकरी वेशभुषा , निवडक अभंग व भक्तीगीतांवर नृत्याविष्कार उपस्थितांचे खास आकर्षण ठरले. मुलांच्या तयारीर मुख्याध्यापक सयाजी ठाकरे, उप शिक्षक हेमा मुळणकर, पंत्या कुवर यानी परिश्रम घेतले. विद्यार्थी व शिक्षकांचे उपस्थितांनी कौतुक केले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.
**फोटो-रेडगाव खुर्द ता. चांदवड येथील सप्ताहात सहभागी झालेले बाल वारकरी व उपस्थित ग्रामस्थ ,वारकरी आदी.. छाया:सुनील काळे
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro