Ticker

6/recent/ticker-posts

दहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात

दहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात.
दिघवद (पत्रकार -कैलास सोनवणे):दिघवद वार्ताहर चांदवड तालुक्यातील दहिवद येथे बुधवार पासून आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला असुन सकाळी आठ वाजता हिरापुर ग्रामपंचायत आदर्श गाव राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच आर ,डि थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम,वि,पी, शेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर दहिवद ग्रामपंचायत सरपंच सौ दिपालीताई निंबाळकर उपसरपंच सौ छाया वाघमोडे हे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी थोरात यांनी पहिल्या दिवशी शेतकरी व्यापारी व ग्राहक यांची गर्दी पाहून दहिवद गाव व्यापारी गाव म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण होईल लासलगाव व चांदवड शहरांच्या मधेवर असल्याने शेतकरी व्यापारी व ग्राहक यांना खुप गरजेचे होते दहिवद ग्रामपंचायतीच्या सरपंच व संचालकांचे कवतुक केले, शेती माला बरोबरच इतर मालाला योग्य जागा व बसण्यासाठी ओटे पाणी पावसाळ्यात शेडची व्यवस्था करण्यात येईल असे सरपंच सौ दिपालीताई निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी जगन्नाथ निंबाळकर माजी सरपंच संजय खांदे यांनी मनोगत व्यक्त केले.


 यावेळी अशोक निंबाळकर संजय निंबाळकर भास्कर जाधव बाजीराव भुतनार तुकाराम निंबाळकर तानाजी वाघमोडे किशोर केदारे याशिन शेख नामदेव निंबाळकर पोपटजाधव ज्ञानेशर निंबाळकर नातु झुराळे दतु भुतनार बबन सोनवणे साहेबराव केदार उत्तम खांदे परशराम गांगुर्डे कैलास खांदे शिवाजी वाघमोडे मिराबाई निंबाळकर बाबुलाल शेख रविंद्र निंबाळकर उदय जाधव रविंद्र निंबाळकर दहिवद परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी दहिवद पोलिस पाटील रमेश निंबाळकर यांनी आलेल्या शेतकरी व्यापारी व ग्राहक यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या