Ticker

6/recent/ticker-posts

संगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर

 संगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर काजीसांगवीः (उत्तम आवारे) आज दि.१४/०९/२०२२ रोजी पंचायत समिती चांदवड येथे कामबंद आंदोलनाचे निवेदन मा.गटविकास अधिकारी सो यांना देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांचे गेले माहे एप्रिल 2022 पासूनचे मानधन हे थकीत असून सदर चौकशी केली असता जिल्हा परिषदेने असे सांगितले की चांदवड तालुक्याचे आपले सरकार सेवा केंद्राचे मानधन हे आमच्या स्तरावर वर्ग केले नसल्यामुळे आपले मानधन हे थकीत आहे त्यामुळे पेमेंट करता येणार नाही.

तरी दि.05/09/2022 रोजी मा.गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते की,15/09/2022 पर्यंत आपल्या स्तरावरून ग्रामपंचायतीचे rtgs हे करून घ्यावे तशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात. तरीही निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे दि.15/09/2022 पासून चांदवड तालुक्यातील संगणक परिचालक हे कामबंद आंदोलन करणार आहे.

या कामबंद आंदोलनात csc तसेच महाऑनलाईन कोणत्याही प्रकारच्या सेवा या देण्यात येणार नाही.ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रकारची कोणतीही कामे संगणक परिचालक करणार नाही.सर्व प्रकारची ऑनलाइन तसेच ऑफलाईन कामे करून ही संगणक परिचालक यांना वेळेवर मानधन मिळत नाही.मा. गटविकास अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा झाली असता  जोपर्यंत सर्व संगणक परिचालक यांच्या मानधनाचे rtgs हे 100% होत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे अशी माहिती चांदवड संगणक परिचालक संघटनेचे तालुका अध्यक्ष  अण्णासाहेब काळे यांनी दिले. यावेळी चांदवड तालुक्यातील सर्व संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या