रेडगावला भरला विद्यार्थ्यांचा भाजीबाजार. पुस्तकी शिक्षणा बरोबर व्यवहारिक शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम
काजीसांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुक्यातील रेडगाव येथील जि. प. शाळेने मुलांना पुस्तकी शिक्षणा बरोबर कृतीयुक्त व्यवहारिक शिक्षण मिळावे म्हणून विद्यार्थ्यांचा भाजीबाजार भरवला. या स्तुत्य उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.तासाभराच्या बाजारात 2833रुपयाची उलाढाल झाली.
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात सतत तेच-ते काम अन त्यातुन येणारे ताण-तणाव ,या समस्येने लहानापासुन मोठ्यांना ग्रासले आहे. हा ताण-तणाव अनेक आजारांचा निमंत्रक ठरत आहे. शिक्षणातही काही अंशी पालकांच्या अतिरिक्त अपेक्षामुळे मुलांचे खेळते वय दबले जाते त्या पार्श्वभुमीवर एक दिवस दफ्तरमुक्त शाळा अभियांनांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तसेही आई वडीलांसोबत बाजारात यात्रेत जाण्याची मोठी हौस मुलांना असते. ती हौस व पुस्तकी शिक्षण बरोबर कृतीयुक्त व्यवहारिक शिक्षण मिळावे म्हणून मुख्याध्यापक सयाजी ठाकरे, हेमा मुळणकर पंत्या कुवर 1लीते 4थी च्या विद्यार्थ्यांंचा भाजी बाजार भरविला. अंबादास काळे याच्या हस्ते श्रीफळ उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी घरचा उपलब्ध कढी पत्ता, बटाटे, कांदे, डांगर, भोपळाभेडी, अळुपाने, लिंबु, लहसुन, अशा विविध भाज्या आणल्या होत्या. खरेदीसाठी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभुन तासाभराच्या बाजारात 2833रुपयाची उलाढाल झाली.या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
येथे विद्यार्थ्यानी भरविलेला भाजी बाजार व खरेदी साठी झालेली नागरीकांची गर्दी.... छाया:सुनील काळे
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro