सुरू उसाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. भारी व चोपण जमिनीत शक्यतो कोरड्या पध्दतीने लागवड करावी. डोळा वरच्या बाजूस ठेऊन हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेऊन डोळे दोन्ही बाजूस येतील, असे पाहून लागवड करावी. मध्यम जमिनीत ओल्या पध्दतीने लागवड केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास, दोन रोपांतील अंतर मध्यम जमिनीत १.५ फूट व भारी जमिनीत २ फूट ठेवावे.
भेंडी लागवड तंत्रज्ञान
भेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro